Suryakumar Yadav MI vs KKR  esakal
IPL

MI vs KKR : कर्णधार होताच सूर्या तळपला! इशान किशनही अर्धशतक करून चमकला

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav MI vs KKR : मुंबई इंडियन्स ताळ्यात आली असून सलग दोन पराभवानंतर मुंबईने सलग दोन विजय मिळवले. कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी ठेवलेले 186 धावांचे आव्हान 6 फलंदाज आणि 17.4 षटकात पार करत सहज विजय मिळवला. मुंबईचा सलामीवीर इशान किशनला अखेर सूर गवसला. त्याने 25 चेंडूत 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधारपद सांभाळलेल्या सूर्याने देखील 43 धावांची खेळी करत आपला धावांचा दुष्काळ संपवला.

मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशनला अखेर सूर गवसला. त्याने रोहित शर्मा सोबत 5 षटकात 65 धावांची सलामी दिली. रोहित शर्मा 13 चेंडूत 20 धावा करून बाद झाल्यानंतर त्याने सूर्यकुमार सोबत भागीदारी रचत संघाला 8 व्या षटकात 87 धावांपर्यंत पोहचवले. अखेर वरूण चक्रवर्तीने त्याला 58 धावांवर बाद केले.

इशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डावाची सूत्रे आपल्या हातत घेतली. या दोघांनी मुंबईला 12 व्या षटकात 130 धावांपर्यंत पोहचवले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली. मात्र सुयश शर्माने तिलक वर्माला 30 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

वर्मा बाद झाला त्यावेळी मुंबईला विजयासाठी 37 चेंडूत 39 धावांची गरज होती. टीम डेव्हिड आणि सूर्यकुमार यादवने संघाला 174 धावांपर्यंत पोहचवले. मात्र अर्धशतकाजवळ पोहचलेला सूर्यकुमार यादव 43 धावांवर बाद झाला. मात्र तोपर्यंत सामना मुंबईच्या 20 चेंडूत 10 धावा असा आवाक्यात आला होता.

तत्पूर्वी, दुखापतीतून सावरलेल्या व्यंकटेश अय्यरने यंदाच्या आयपीएलमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. त्याने मुंबई विरूद्धच्या सामन्यात 104 धावांची शतकी खेळी करत केकेआरला 20 षटकात 185 धावांपर्यंत मजल मारून देण्यात मोठा वाटा उचलला. त्याला रसेलने 21 धावा करत चांगली साथ दिली. मुंबईकडून ऋतिक शौकीनने चांगला मारा करत 2 विकेट्स घेतल्या. तर पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने 2 षटकात 17 धावा दिल्या.

(Sports Latets News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT