chennai super kings champions important role Maharashtra played  
IPL

CSK IPL 2023: चेन्नईच्या विजेतेपदाला महाराष्ट्राचे कोंदण! विक्रमी जेतेपदात चार खेळाडूंचा मोलाचा वाटा

सकाळ वृत्तसेवा

CSK IPL 2023 : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने सोमवारी मध्यरात्री गतविजेत्या गुजरात टायटन्सला पराभूत करत पाचव्यांदा ‘आयपीएल’ विजेतेपदाला गवसणी घातली. चेन्नई सुपरकिंग्सने मुंबई इंडियन्सच्या पाच विजेतेपदांची अगदी रुबाबात बरोबरी साधली.

चेन्नई सुपरकिंग्सच्या विक्रमी जेतेपदात महाराष्ट्राच्या चार खेळाडूंचा मोलाचा वाटा होता. याच पार्श्वभूमीवर सकाळने अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे व तुषार देशपांडे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमात केलेल्या संस्मरणीय कामगिरीवर दृष्टिक्षेप टाकला.

Ajinkya Rahane

मुंबईकर अजिंक्य रहाणे याने भारताच्या कसोटी संघातील स्थान गमावले होते. स्थानिक क्रिकेटमध्ये खेळून तो पुनरागमनासाठी प्रयत्न करीत होता; मात्र भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारावर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडे होणार नव्हते. याप्रसंगी आयपीएलचा लिलाव त्याच्यासाठी धावून आला.

मास्टरमाईंड धोनीने कुणीही बोली न लावलेल्या अजिंक्यला मूळ किमतीवर (५० लाख) आपल्या संघात समाविष्ट करण्याचा सल्ला संघ मालकांना दिला. एवढेच नव्हे, तर मधल्या फळीत मनसोक्त खेळण्याची परवानगीही त्याला दिली. जेतेपद मिळवल्यानंतर स्वत: अजिंक्यने याबाबत बोलून दाखवले. अजिंक्यने २ अर्धशतकांसह आणि १७२.४८ च्या स्ट्राईक रेटने ३२६ धावांचा पाऊस पाडला. त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले. ७ जूनपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्य पदाच्या लढतीत खेळणार आहे.

Rituraj Gaikwad

पुण्याचा ऋतुराज गायकवाड हा २०१९ पासून चेन्नई संघाचा सदस्य आहे, पण २०२१ मध्ये त्याने ६३५ धावांचा पाऊस पाडला आणि तिथपासून तो संघाचा अविभाज्य घटक झाला. स्थानिक क्रिकेटसह आयपीएलमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली.

जागतिक कसोटी अजिंक्यपद लढतीसाठीही त्याची टीम इंडियात निवड झाली होती, पण त्याचदरम्यान लग्न असल्यामुळे त्याने या लढतीमधून माघार घेतली. यंदाच्या आयपीएल मोसमात त्याने ४ अर्धशतकांसह ५९० धावा फटकावल्या. त्याने डेव्होन कॉनवे याच्यासोबत ८४९ धावांची सलामी भागीदारी करताना चेन्नईला सातत्याने दमदार सुरुवात करून दिली.

shivam dube

शिवम दुबे हा २९ वर्षीय मुंबईकर भारतासाठी टी-२० व वनडे क्रिकेट खेळला आहे, पण सध्या तो संघातून बाहेर आहे. चेन्नईच्या संघव्यवस्थापनाने त्याच्या खांद्यावर मधल्या फळीची जबाबदारी सोपवली. त्याने ती इमानेइतबारे निभावली. संघाला गरज असताना तो मैदानात उभा राहायचा आणि धावा करायचा. तीन अर्धशतकांसह त्याने ४१८ धावांची फटकेबाजी केली. आगामी काळात त्यालाही भारतीय संघात स्थान मिळवण्याची आशा बाळगता येऊ शकते.

Tushar Deshpande

चेन्नईच्या संघात यंदाच्या मोसमात अनुभवी वेगवान गोलंदाजांची कमतरता होती. धोनीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नवख्या, अनुभव नसलेल्या गोलंदाजांवर विश्‍वास दाखवला. मथिशा पथिरानासह मुंबईच्या तुषार देशपांडेला त्याने संधी दिली. दोघांनीही संधीचे सोने केले. तुषारने २१; तर पथिरानाने १९ विकेट बाद करीत चेन्नईला पंचतारांकित यश मिळवून दिले. महाराष्ट्राचा राजवर्धन हंगरगेकर यालाही दोन सामन्यांसाठी संधी दिली होती, पण त्यानंतर त्याला खेळवण्यात आले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT