Chennai Super Kings vs Delhi Capitals ESAKAL
IPL

CSK vs DC IPL 2023 : धोनीच्या चेन्नईचा दिल्लीवर शानदार विजय मात्र पॉईंट टेबलमध्ये तसूभरही नाही बदल

अनिरुद्ध संकपाळ

Chennai Super Kings vs Delhi Capitals : चेन्नई सुपर किंग्जचे 168 धावांचे आव्हान दिल्ली कॅपिटल्सला पेलवले नाही. त्यांना 20 षटकात 8 बाद 140 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईने सामना 27 धावांनी जिंकत आपली गुणसंख्या 15 वर नेली. चेन्नईकडून मथिशा पथिरानाने 3 तर दिपक चाहरने 2 बळी टिपले. दिल्लीकडून रिले रूसोने सर्वाधिक 35 धावा केल्या. जरी चेन्नईने सामना जिंकून 2 गुणांची कमाई केली असली तरी आयपीएलचे पॉईंट टेबल तसूभरही हलले नाही. चेन्नई सुपर किंग्ज 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर दिल्ली कॅपिटल्स तळात होती ती तळातच राहिली.

चेन्नई सुपर किंग्जने विजयासाठी ठेवलेल्या 168 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजीला पहिल्या चेंडूपासूनच गळती लागली. संघाचा कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दीपक चाहरने पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. यानंतर आक्रमक फलंदाजी करणारा फिल्प सॉल्टने 2 षटकार आणि एक चौकार ठोकला. मात्र दीपकने त्याची ही खेळी 17 धावांवर संपवली. त्यानंतर आलेला मिचेल मार्श देखील 5 धावांची भर घालून माघारी परतला.

अवघ्या 25 धावात दिल्लीने 3 फलंदाज गमावल्यानंतर रिले रूसो आणि मनिष पांडेने दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी पथिरानाने फोडली. त्याने मनिष पांडेला 27 धावांवर गारद केले. त्यानंतर रूसो देखील 37 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. त्याची शिकार रविंद्र जडेजाने केली. निम्मा संघ 15 षटकात 89 धावात गारद झाल्यामुळे दिल्लीची सामन्यावरील पकड ढिली झाली.

रूसो बाद झाल्यानंतर आलेल्या अक्षर पटेलने आक्रमक फटकेबाजी करत 12 चेंडूत 21 धावा ठोकल्या. त्याने दिल्लीसाठी थोडा आशावाद निर्माण केला. मात्र स्लॉग ओव्हरमध्ये पथिरानाने आपला जलवा पुन्हा दाखवत अक्षर पटेल आणि ललित यादवची शिकार केली. अखेर चेन्नईने सामना 27 धावांची जिंकून आपली गुणसंख्या 15 वर नेली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

SCROLL FOR NEXT