PBKS vs CSK IPL 2024 Play Off Point Table  esakal
IPL

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

अनिरुद्ध संकपाळ

PBKS vs CSK IPL 2024 Play Off Point Table : चेन्नई सुपर किंग्जने आज पंजाब किंग्जचा 28 धावांनी पराभव करत उट्टे काढले. गेल्या सामन्यात पंजाबने चेन्नईचा चेन्नईत पराभव केला होता. चेन्नईने प्रथम फलंदजी करत 168 धावांचे आव्हान ठेवले. तर पंजाबला 20 षटकात 9 बाद 139 धावाच करता आल्या. सीएसकेच्या या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज ही आता 11 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे. प्ले ऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने सीएसकेला टॉप 4 मध्ये जाणे महत्वाचे होते. आता ते तिसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. सीएसकेला आता उर्वरित तीन सामन्यात किमान एक विजय मिळवणे गरजेचे आहे.

सीएसकेच्या या विजयामुळे पंजाब किंग्जच्या प्ले ऑफ गाठण्याच्या स्वप्नाला तडा गेला आहे. याचबरोबर इतर पाच फ्रेंचायजींना देखील तगडा धक्का बसला आहे. जर आजचा सामना चेन्नई हरली असती तर त्याचा थेट परिणाम हा दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर बंगळुरू, मुंबई इंडियन्स यांच्यासारख्या संघांवर होणार आहे. त्यांच्यासाठी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याची आशेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

आजच्या विजयामुळं चेन्नई गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे. त्याचे 12 गुण झाले असून त्यांचे नेट रनरेट हे +0.700 आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स आणि सनराईजर्स हैदराबादचे 12 गुण होऊन देखील ते अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

आज डबल हेडर असल्यानं लखनौला गुणतालिकेत सीएसकेचा तिसरा क्रमांक पटकावण्याची संधी आहे. मात्र त्यांना केकेआरचं कडवं आव्हान पेलावं लागणार आहे. केकेआर आज गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार आहे.

जरी लखनौने सामना जिंकला तरी चेन्नई तिसऱ्या वरून चौथ्या क्रमांकावर जाते म्हणजे ते टॉप फोरमध्ये कामय राहतात. दुसरीकडं 10 गुण असलेल्या दिल्लीला प्ले ऑफमध्ये पोहचायचं असेल तर त्यांना तीन पैकी तीन सामने जिंकणे गरजेचे आहेत. कारण त्यांचे नेट रनरेट हे उणे आहे त्यामुळे ते जर 14 गुणांवर अडकले तर हे उणे नेट रनरेट त्यांचा घात करू शकते.

बंगळुरू, मुंबई, पंजाबने त्यांचे उर्वरित तीन सामने जिंकले तरी त्यांना प्ले ऑफ गाठणे मुश्कील आहे. कारण त्यांचे 14 गुण झाले तरी नेट रनरेटमध्ये ते मागे असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे चेन्नईने जरी तीन पैकी एक सामना जिंकला तरी त्यांचे 14 गुण होतात अन् त्यांचे नेट रनरेट हे सध्याच्या घडीला इतरांपेक्षा सरस आहे.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT