MS Dhoni Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत शनिवारी (18 मे) 68 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियवर होणारा हा सामना प्लेऑफच्यादृष्टीने दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
या सामन्यात जर चेन्नईने विजय मिळवला, तर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. तसेच बेंगळुरूचे आव्हान संपेल. पण जर बेंगळुरूने चेन्नईला 18 धावांनी किंवा 11 चेंडू राखून विजय मिळववा, तर बेंगळुरू प्लेऑफमध्ये पोहचतील.
त्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याच्या गोलंदाजीने बेंगळुरूला चकीत करणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण या सामन्यापूर्वी चेन्नईने धोनी नेटमध्ये गोलंदाजी सराव करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, सध्या अशी चर्चा आहे की धोनी त्याचा अखेरचा आयपीएल हंगाम खेळत आहे. त्यामुळे जर हे खरे असेल, तर जर चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले, तर त्याचा हा अखेरचा सामना ठरेल. कारण शनिवारी होणारा सामना दोन्ही संघांचा अखेरचा साखळी सामना आहे.
धोनी यंदाच्या हंगामात शेवटच्या काही षटकांमध्ये फलंदाजीला उतरताना दिसला आहे. त्याने 13 सामन्यांतपैकी 8 सामन्यात नाबाद राहत 226.67 च्या स्ट्राईक रेटने 136 धावा केल्या आहेत.
दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर चेन्नईने 13 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आहेत आणि 6 सामने पराभूत झाले आहेत. तसेच बेंगळुरूने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 7 सामने पराभूत झाले आहेत.
तसेच चेन्नईची कामगिरी संमिश्र राहिली आहे, तर बेंगळुरूने पहिल्या 8 सामन्यांत 7 पराभव स्विकारल्यानंतर सलग 5 विजय मिळवले आहेत.
दरम्यान, बेंगळुरू आणि चेन्नई यांच्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर चेन्नई 15 गुण मिळवत प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.