Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders esakal
IPL

CSK vs KKR : नितीश राणा - रिंकू सिंहची झुंजार खेळी, केकेआरने सीएसकेचा केला 6 विकेट्सनी पराभव

अनिरुद्ध संकपाळ

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : चेन्नई सुपर किंग्ज आजचा केकेआरविरूद्धचा सामना जिंकून थाटात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होते. मात्र केकेआरच्या रिंकू सिंह आणि नितीश राणा या डावखुऱ्या जोडीने हंगामतील पहिली प्लेऑमध्ये प्रवेश करणारी टीम होण्यापासून सीएसकेला रोखले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 99 धावांची दमदार भागीदारी रचत चेन्नईचे 145 धावांचे आव्हान 6 गडी राखून पार केले. रिंकू सिंहने 43 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर कर्णधार नितीश राणाने 44 चेंडूत 57 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. सीएसकेकडून दीपक चाहरने 3 विकेट्स घेतल्या.

आयपीएलच्या 16 व्या हंगामात प्ले ऑमध्ये जाण्यासाठी धडपडणाऱ्या चेन्नईची आज केकेआरसमोर अवस्था बिकट झाली होती. त्यांचा निम्मा संघ हा 72 धावात गारद झाला. मात्र डावखुऱ्या शिवम दुबेने नाबाद 48 धावांची झुंजार खेळी केली. त्याला रविंद्र जडेजाने 20 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. सलामीवीर डेवॉन कॉन्वेने देखील 30 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या 68 धावांच्या भागीदारीमुळे चेन्नईने 20 षटकात 6 बाद 144 धावांपर्यंत मजल मारली. केकेआरकडून वरूण चक्रवर्ती आणि सुनिल नरेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

शिवम दुबे - जडेजाने सावरले. 

चेन्नईची अवस्था 5 बाद 72 धावा अशी झाली असताना डावखुरे फलंदाज शिवम दुबे आणि रविंद्र जडेजाने चेन्नईला सावरले. या दोघांनी 17 व्या षटकात चेन्नईचे शतक धावलफलकावर लावले. या दोघांनी ही भागीदारी अर्धशतकापर्यंत नेली. आक्रमक फलंदाजी करणारा शिवम दुबेही आपल्या अर्धशतकीजवळ पोहचला होता.

शिवम दुबेच्या हातात फक्त शेवटचे षटक होते. त्याला आपलेही अर्धशतक आणि चेन्नईलाही दीडशतकी मजल मारून द्यायची होती. शेवटचे षटक टाकणाऱ्या वैभव अरोराने पहिल्या 3 चेंडूवर 5 धावा दिल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवर रविंद्र जडेजा 24 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. दुबे आणि जडेजाची 68 धावांची भागीदारी तुटली.

मात्र मैदानावर एकच जल्लोष झाला कारण धोनी फलंदाजीला आला. शेवटचे दोन चेंडू वाट्याला असताना धोनीला फ्री हिट मिळाली. मात्र वैभवने धोनीचा त्रिफळा उडवला. संपूर्ण मैदान शांत झाले. आता धोनीकडे षटकार मारण्यासाठी फक्त 1 चेंडू होता. मात्र त्यावर धोनीला फक्त 2 धावाच करता आल्या. चेन्नईने 20 षटकात 6 बाद 144 धावांपर्यंत मजल मारली. शिवम दुबेने नाबाद 48 धावांची झुंजार खेळी केली.

चेन्नईची मधील फळी ढेपाळली

दुसऱ्या बाजूने सावध फलंदाजी करणारा डेवॉन कॉन्व 30 धावांपर्यंत पोहचला होता. मात्र शार्दुल ठाकूरने त्यालाही 10 व्या षटकात बाद करत चेन्नईची अवस्था 3 बाद 66 अशी केली. चेन्नईचा सेट झालेला फलंदाज बाद झाल्यानंतर अंबाती रायुडू आणि शिवम दुबे डाव सावरतील असे वाटत होते. मात्र सुनिल नरेनने रायुडूला 4 धावांवर बाद केले. याच षटकात नरेनने मोईन अलीला देखील 1 धावेवर बाद करत सीएकेची अवस्था 5 बाद 72 अशी केली.

चेन्नईला दोन धक्के

नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची सुरूवात आक्रमक झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वेने 3 षटकात 30 धावा केल्या होत्या. मात्र वरूण चक्रवर्तीने ऋतुराजला 17 धावांवर बाद केले. यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणे आणि कॉन्वेने सीएसकेला 8 षटकात 61 धावांवर पोहचवले. मात्र चक्रवर्तीने अजून एक धक्का देत अजिंक्य रहाणेला 16 धावांवर बाद केले.

चेन्नईने नाणेफेक जिंकली

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT