CSK vs LSG IPL 2024  esakal
IPL

CSK vs LSG IPL 2024 : स्टॉयनिस एकटा चेन्नईला चेन्नईत भिडला; वचपा तर लखनौनं काढला

अनिरुद्ध संकपाळ

CSK vs LSG IPL 2024 Live Cricket Score : स्टॉयनिसची दमदार बॅटिंग; चेन्नईचं टेन्शन वाढवलं

लखनौ सुपर जायंट्सचा फलंदाज मार्कस स्टॉयनिस यंदाच्या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. मात्र चेन्नई विरूद्धच्या सामन्यात त्यानं दमदार फलंदाजी करत लखनौला 17 व्या षटाकत 160 धावांचा टप्पा पार करून दिला. यामुळे चेन्नईचं टेन्शन वाढलं.

CSK vs LSG IPL 2024 Live Cricket Score : ऋतुराजचं नाबाद शतक, दुबेनं ठोकल्या 27 चेंडूत 66 धावा; लखनौसमोर 211 धावांच आव्हान

चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 4 बाद 210 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडनं 108 धावांची शतकी खेळी केली. त्याला शिवम दुबेने 27 चेंडूत 66 धावा करत समर्थ साथ दिली. त्यानंतर धोनीने एका चेंडूत एक चौकार मारत चाहत्यांचे पैसे वसूल करून दिले.

CSK vs LSG IPL 2024 Live Cricket Score : सलामीला परतताच ऋतुराजनं ठोकलं शतक; सीएसकेने पार केल्या 175 धावा

ऋतुराज गायकवाडने 56 चेंडूत शतक ठोकत संघाला 175 धावांचा पार पोहचवलं. ऋतुराजचं हे आयपीएलमधील दुसरं शतक आहे. दुसऱ्या बाजूने शिवम दुबेने 18 चेंडूत 39 धावा करत सीएसकेला 18 षटकात 178 धावांपर्यंत पोहचवलं.

शिवम दुबेचे सलग तीन षटकार 

शिवम दुबेने 16 व्या षटकात यश ठाकूरला सलग तीन षटकार ठोकत एकाच षटकात 19 धावा वसूल करून घेतल्या. यामुळे चेन्नईने 150 धावांचा टप्पा पार केला.

CSK vs LSG IPL 2024 Live Cricket Score : ऋतुराज सलामीला आला अन् मारली मोठी मजल; चेन्नईची मोठ्या धावसंख्येकडे कूच

ऋतुराज गायकवाड आजच्या सामन्यात सलामीला आला. त्यानं होम ग्राऊंडवर दमदार फलंदाजी करत चेन्नईला 15 षटकात 135 धावांच्या पुढे पोहचवले. शेवटची पाच षटके शिल्लक असताना ऋतुराजच्या साथीला शिवम दुबे आला आहे.

CSK vs LSG IPL 2024 Live Cricket Score : सीएसकेने पॉवर प्लेमध्ये केलं अर्धशतक पार मात्र बसले दोन धक्के

सीएसकेने पॉवर प्लेमध्ये अर्धशतक पार केलं. मात्र अजिंक्य रहाणे आणि डॅरेल मिचेलच्या स्वरूपात त्यांना दोन धक्के बसले. सध्या क्रीजवर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रविंद्र जडेजा खेळत आहेत. सीएसकेने 7 षटकात 56 धावा केल्या असून त्यात ऋतुरातच्या 39 धावांचे योगदान आहे.

चेन्नईने केला एक बदल 

चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात एक बदल केला आहे. आऊट ऑफ फॉर्म रचिन रविंद्रला कट्टा दाखवला असून डॅरेल मिचेल संघात आला आहे. ऋतुराज आणि अजिंक्य रहाणे सलामीला येण्याची शक्यता आहे.

नाणेफेक लखनौनं जिंकली 

चेन्नईच्या होम ग्राऊंडवर नाणेफेक लखनौ सुपर जायंट्सने जिंकली. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेड टू हेड : चेन्नई भारी की लखनौ? 

चेन्नई सुपर किंग्ज आणि नवखी टीम लखनौ सुपर जायंट्स यांच्यात तीनवेळा सामना झाला आहे. त्यात दोनवेळा लखनौ जिंकली असून एकवेळा सीएसकेला विजय मिळवता आला आहे. आज चेन्नईला 2-2 अशी बरोबरी करण्याची संधी आहे.

Chennai Super Kings Vs Lucknow Super Giants Live cricket Score IPL 2024 : 

लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जचे 211 धावांचे आव्हान 19.3 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. मार्कस स्टॉयनिसने झुंजार खेळी करत 63 चेंडूत 124 धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याला निकोलस पूरन आणि दीपक हुड्डा यांनी चांगली साथ देत चेन्नईला चेन्नईत मात देण्यात मोलाचं योगदान दिलं.

चेन्नईने दिलेल्या 211 धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सची सुरूवात खराब झाली होती. मात्र त्यानंतर मार्कस स्टॉयनिसने दमदार फलंदाजी 56 चेंडूत शतक ठोकलं. स्टॉयनिसचं हे आयपीएलमधील पहिलं शतक होतं. या शतकाच्या जोरावर लखनौनं चेन्नईचं टेन्शन वाढवलं. स्टॉयनिसला निकोसल पूरनने 15 चेंडूत 34 धावा ठोकून चांगली साथ दिली. मात्र पथिरानाने त्याचा अडसर दूर केला.

स्टॉयनिस आणि दीपक हुड्डा क्रीजवर असताना 12 चेंडूत विजयासाठी 32 धावांची गरज असताना हुड्डा आणि स्टॉयनिस यांनी पथिरानाच्या षटकात 15 धावा वसूल केल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात विजयासाठी 17 धावांचे टार्गेट आले. मुस्तफिजूरच्या पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसने षटकार ठोकत सामना जवळ आणला. त्यानंतर चौकार मारत सामना 4 चेंडूत 7 धावा असा आणला.

पुढचा चेंडू मुस्तफिजूरने नो बॉल टाकला अन् त्यावर स्टॉयनिसनं चौकार मारला. आता विजयासाठी फक्त 2 धावांची गरज होती. स्टॉयनिसनं अजून एक चौकार मार सामना लखनौच्या खिशात टाकला.

चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 210 धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाबाद 108 धावांची शतकी खेळी केली. तर त्याला शिवम दुबेने 66 धावांची आक्रमक साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची खणखणीत शतकी भागीदारी रतच संघाला 200 पार पोहचवले. लखनौकडून मॅट हेन्री, मोहसीन खान आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT