CSK vs PBKS IPL 2024 News Marathi SAKAL
IPL

CSK vs PBKS IPL 2024 : प्ले-ऑफसाठी रस्सीखेच! चेन्नईशी आज भिडणार पंजाब; कोण मारणार बाजी?

गतविजेता चेन्नई सुपरकिंग्सचा संघ आयपीएलच्या आज (ता. १) होत असलेल्या लढतीत पंजाब किंग्सचा सामना करणार आहे.

Kiran Mahanavar

चेन्नई, ता. ३० : गतविजेता चेन्नई सुपरकिंग्सचा संघ आयपीएलच्या आज (ता. १) होत असलेल्या लढतीत पंजाब किंग्सचा सामना करणार आहे. एकीकडे चेन्नई संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असून दुसरीकडे पंजाबच्या संघाच्या प्रदर्शनातही अनिश्‍चितता दिसून येत आहे. प्ले ऑफसाठी रस्सीखेच सुरू असताना चेन्नईचा संघ सहाव्या विजयासाठी, तर पंजाबचा संघ चौथ्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहे.

कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. त्याने नऊ सामन्यांमधून एक शतक व तीन अर्धशतकांसह ४४७ धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे साहजिकच त्याच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा खिळल्या असणार आहेत; पण ऋतुराजसोबत सलामीला फलंदाजीला येणाऱ्या अजिंक्य रहाणे व राचिन रवींद्र यांना मात्र प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

तरीही रहाणेचे संघातील स्थान कायम असणार आहे. शिवम दुबे (३५० धावा) व डॅरेल मिचेल (१९८ धावा) या दोघांकडून धावा होत आहेत. त्यामुळे मधल्या फळीत या दोघांच्या खांद्यावर चेन्नईच्या फलंदाजीची मदार असणार आहे. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्यामुळे महेंद्रसिंग धोनीला पुरेशी संधी मिळाली नसली तरी त्याने २५९.४५च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या आहेत.

चेन्नईचा गोलंदाजी विभाग मथिशा पथिराना, मुस्तफिजूर रहमान, तुषार देशपांडे व रवींद्र जडेजा यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. मुस्तफिजूरने १४, पथिरानाने १३, तुषारने १० व जडेजाने पाच फलंदाज बाद केले आहेत. दीपक चहर, शार्दुल ठाकूर व मोईन अली यांना कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे.

चेपॉकच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना संधी

पंजाबने ईडन गार्डन स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत कोलकताविरुद्ध २६२ धावांचा विक्रमी पाठलाग केला. जॉनी बेअरस्टोच्या झंझावाती शतकाच्या जोरावर पंजाबने हा देदीप्यमान विजय मिळवला; पण चेन्नई- पंजाब यांच्यामधील लढत चेन्नईतील चेपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीवर होणार आहे. येथे उत्तरार्धातही गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरी होत आहे. चेन्नईने मागील लढतीत हैदराबादचा डाव १३४ धावांवर संपुष्टात आणत ७८ धावांनी विजय संपादन केला होता. त्यामुळे येथील खेळपट्टीवर दोन्ही संघांतील गोलंदाजांना चमक दाखवण्याची संधी असणार आहे.

फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न

पंजाबने मागील लढतीत कोलकता संघाला पराभूत केले. आता हा फॉर्म कायम राखण्यासाठी पंजाबचा संघ प्रयत्न करील. जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, शशांक सिंग यांच्याकडून फलंदाजीत शानदार कामगिरीची अपेक्षा आहे. जितेश शर्माचा सुमार फॉर्म ही पंजाबसाठी चिंतेची बाब आहे. कर्णधार शिखर धवन दुखापतीमधून पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याच्या सहभागावर प्रश्‍नचिन्ह कायम आहे. अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, सॅम करन, कागिसो रबाडा या वेगवान गोलंदाजांना पंजाबसाठी मोलाची कामगिरी करावी लागणार आहे. राहुल चहर व हरप्रीत ब्रार या फिरकीवीरांना अद्याप ठसा उमटवता आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT