Dwayne Bravo Matheesha Pathirana Sakal
IPL

Dwayne Bravo: पाथिराना, मुस्तफिजूरला कोचिंग का करत नाही? CSK चा कोच ब्रावोने सांगितलं वैशिष्ट; यॉर्करबद्दलही केलं मोठं भाष्य

Yorkers ball in T20: चेन्नई सुपर किंग्सचा प्रशिक्षक ड्वेन ब्रावोने टी20 मध्ये यॉर्कर का महत्त्वाचा आहे, याबाबत भाष्य केले आहे. तसेच त्याने पाथिराना-मुस्तफिजूरचंही कौतुक केलं आहे.

Pranali Kodre

Dwayne Bravo CSK Coach: चेन्नई सुपर किंग्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून गेल्या दोन वर्षांपासून ड्वेन ब्रावो जबाबदारी सांभाळत आहे. त्याने मथिशा पाथिराना आणि मुस्तफिजूर रेहमान सारख्या गोलंदाजांबरोबर काम करताना मजा येत असल्याचे त्याने म्हटले आहे.

नुकतेच आयपीएलच्या वेबसाईटशी बोलताना ब्रावोने यॉर्कर चेंडू किती महत्त्वाचा आहे, याबाबतही त्याने भाष्य केले. त्याचबरोबर त्याने पाथिराना आणि मुस्तफिजूरचे कौतुकही केले आहे.

यॉर्कर का महत्त्वाचा?

ब्रावो टी20 क्रिकेटमध्ये यॉर्करचे महत्त्व सांगताना म्हणाला, 'टी20 क्रिकेटमध्ये बऱ्याचदा गोलंदाज संघर्ष करतात कारण ते यॉर्कर टाकण्याच्या त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे मी प्रशिक्षण सत्रात प्रत्येक गोलंदाजांकडून 12-14 यॉर्कर टाकून घेतो. जर तुम्ही त्यावर काम केले, तर सामन्यात ते सोपे जाते.'

तसेच ब्रावो म्हणाला, 'यॉर्करव्यतिरिक्त तुम्ही दीर्घकाळ टिकू शकत नाही. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक यश मिळालेल्या गोलंदाजांकडे तुम्ही पाहाल, तर लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, पाथिराना, मी, अशा आमच्या सर्वांची सारखीच योजना असते, ती म्हणजे शक्य तितके यॉर्कर टाकणे.'

चेन्नईच्या गोलंदाजांचे केलं कौतुक

चेन्नईच्या संघाकडून खेळणाऱ्या पाथिराबद्दल बोलताना ब्रावो म्हणाला, 'पाथिराना खूप विशेष आहे. मी त्याला बेबी मलिंगा किंवा बेबी गोट म्हणतो. तो असा खेळाडू नाही की ज्याला तुम्ही प्रशिक्षण देऊ शकता, कारण त्याच्याकडे नैसर्गिक क्षमता आणि कौशल्य आहे.'

तसेच मुस्तफिजूरबद्दल बोलताना ब्रावो म्हणाला, 'फिझ देखील खूप खास आहे. त्याची ऍक्शन खूप वेगळी आहे. सर्वोत्तम स्लोअर बॉल टाकणारा गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. अशा खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत नाही, त्यांना फक्त तुमच्या ज्ञानाने शक्ती देण्याची गरज असते. हे जितके सोपे ठेवता येईल, तितके मी ठेवतो.'

याशिवाय तुषार देशपांडेचेही ब्रावोने कौतुक केले. तो म्हणाला, 'तुषार एक असा खेळाडू आहे, ज्याने मला प्रभावित केले आहे. विशेषत: गेल्या हंगामात आणि याही हंगामात.'

याशिवाय चेन्नई संघातील एकूण वातावरणाबद्दल बोलताना ब्रावो म्हणाला,'आम्ही आमच्या टीम मिटिंगमध्ये म्हणतो की आम्हाला एक चाणाक्ष गोलंदाजी संघ बनायचे आहे. आम्ही आमच्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न करतो.'

'आम्ही प्रत्येक परिस्थितीची तयारी करतो. आम्ही मैदानाचे परिमाण लक्षात घेऊन ड्रिल्स करतो. आम्ही एक विशिष्ट हेतूने, दूरदृष्टीने सराव करतो. जेव्हा लोक आम्हाला पाहातात, तेव्हा त्यांना आमच्याकडे योजना असल्याचे स्पष्ट दिसते, कधी ती योजना काम करत नाही, पण बऱ्याचदा योजना काम करतेही.'

दरम्यान, ब्रावोबद्दल सांगायचे झाल्यास तो अनेक वर्षे आयपीएलमध्ये खेळला असून तो बराच काळ चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख खेळाडू होता. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजही आहे. त्याने 161 आयपीएल सामने खेळले असून 183 विकेट्स घेतल्या आहेत. (Dwayne Bravo on importance of yorkers in T20 Cricket)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT