CSK CEO Kasi Viswanathan on Captaincy Change  Sakal
IPL

IPL 2024: 'CSK मॅनेजमेंट हस्तक्षेप करत नाही' ऋतुराजला कर्णधार करण्यावरून चेन्नईच्या CEOचा मुंबई इंडियन्सला टोला?

CSK CEO Kasi Viswanathan: आयपीएल 2024 पूर्वी एमएस धोनीने ऋतुराज गायकवाडकडे चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सोपवण्याबद्दल फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी मोठे भाष्य केले आहे.

Pranali Kodre

CSK CEO Kasi Viswanathan: चेन्नई सुपर किंग्स संघाला इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात (IPL 2024) नवा कर्णधार मिळाला. आयपीएल 2024 पूर्वी एमएस धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा देत ऋतुराज गायकवाडकडे चेन्नई संघाच्या नेतृत्वाची धूरा सोपवली.

याबाबत आता चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी भाष्य करताना मुंबई इंडियन्सला कोपरखळी मारली असल्याचे म्हटले जात आहे.

धोनीने 14 वर्षे चेन्नई संघाचे नेतृत्व करताना 5 वेळा आयपीएल ट्रॉफी आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकली. अशा यशानंतर चेन्नईची धूरा ऋतुराजच्या हाती सोपवली. पण हे हस्तांतरण खूप गोंधळ न होता झाले. तसेच अशा गोष्टींमध्ये फ्रँचायझीचे व्यवस्थापन लक्ष देत नसल्याचे विश्वनाथन म्हणाले.

चेन्नई सुपर किंग्सच्या युट्युब चॅनेलवर कासी विश्वनाथन यांच्या मुलाखतीच्या व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी विविध प्रश्नांची उत्तर दिली आहेत. यावेळी त्यांना चेन्नई संघात झालेल्या नेतृत्त्वाबद्दल विचारण्यात आले.

त्यावर कासी विश्वनाथन म्हणाले, 'मला वाटते चेन्नई सुपर किंग्स चाहत्यांनी ऋतुराजला कर्णधार म्हणून स्विकारले, कारण धोनीने त्याला निवडले होते. संघव्यवस्थापनाने त्याला कर्णधार म्हणून निवडले होते.'

'तुम्हाला माहिती आहे की चेन्नई सुपर किंग्सचे व्यवस्थापन क्रिकेटमधील घडामोडींमध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे ऋतुलाही त्याची मदत झाली, कारण त्याला सूचना केवळ संघव्यवस्थापनाकडूनच येणार आहे, याबाबत तो स्पष्ट होता. त्याला कामगिरी करून दाखवण्याची जबाबदारी होती. मला खात्री आहे की तो भविष्यातही खूप चांगली कामगिरी करून दाखवेल.'

दरम्यान, या प्रतिक्रियेतून कासी विश्वनाथन यांनी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनावर टीका केल्याचा कयास वर्तवला दात आहे. कारण आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सनेही नेतृत्व बदल केला होता.

त्यांनी रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची धूरा सोपवली होती. परंतु, हा निर्णय ज्यापद्धतीने घेण्यात आला, त्यावरून मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT