RCB vs CSK  Sakal
IPL

IPL 2024: प्लेऑफमधील प्रवेशानंतर RCB चाहत्यांचे स्टेडियमबाहेर CSK समर्थकांबरोबर गैरवर्तन? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

RCB Fans: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत आयपीएल २०२४ प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी स्टेडियमवर बाहेर गैरवर्तवणूक केल्याचे आरोप होत आहेत.

Pranali Kodre

IPL 2024, CSK vs RCB: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धेतील 68 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला 27 धावांनी पराभूत केले. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजयासह बेंगळुरूने प्लेऑफमध्येही प्रवेश पक्का केला आहे.

प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी बेंगळुरूला चेन्नईविरुद्ध 18 धावांनी विजय मिळवणे गरजेचे होते. त्यामुळे बेंगळुरूने 27 धावांनी विजय मिळवल्याने त्यांच्या प्लेऑफमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.

विशेष म्हणजे बेंगळुरूने पहिल्या 8 सामन्यांतील 7 सामने पराभूत झाल्यानंतर सलग ६ सामने जिंकत प्लेऑफचं तिकीट मिळवलं. त्यामुळे बेंगळुरूचा हा विजय चर्चेत राहिला. बेंगळुरूच्या चाहत्यांनीही संघाच्या विजयाचे जोरदार सेलीब्रेशन केले.

अनेक ठिकाणी चाहत्यांनी रस्त्यावर उतरत बेंगळुरूच्या विजायचा आनंद साजरा केला. मात्र काही चाहत्यांनी या सेलीब्रेशन दरम्यान गैरवर्तवणूक केल्याचेही समोर येत आहे.

काही सोशल मीडिया युझर्सने पोस्ट केले आहे की एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेन्नईच्या चाहत्यांना बेंगळुरूच्या काही चाहत्यांकडून त्रास दिला गेला. तसेच गैरवर्तवणूकही करण्यात आली.

एका युझरने याबाबत पोस्टमध्ये लिहिले की 'चिन्नास्वामी स्टेडियमवरच्या आसपास आणि बाहेर चेन्नई सुपर किंग्सची जर्सी घालणं असुरक्षित वाटलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या काही चाहते तिथून चालणाऱ्या प्रत्येकाशी गैरवर्तवणूक केली आणि त्यांना त्रास दिला. येथे खूप पुरुष मद्यधुंद झाले होते आणि ते महिला आणि पुरुष, सर्वांनाच त्रास देत होते. लोक रॅश ड्रायव्हिंग करत आहेत.'

यानंतर बेंगळुरू पोलिसांनी त्यावर उत्तर देत ११२ क्रमांकावर फोन करून त्वरित तक्रार करण्यास सांगितले.

दरम्यान, असे असतानाच काही युजर्सने जुने व्हिडिओ शेअर करत चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांनीही बंगळुरुच्या चाहत्यांना विशेषत: मुलींना त्रास दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये यामुळे चर्चांना उधाण आल्याचे दिसून येत आहे.

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 218 धावा करत चेन्नईसमोर विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 20 षटकात 7 बाद 191 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT