IPL

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Richard Gleeson debut: चेन्नई सुपर किंग्सकडून 36 वर्षीय गोलंदाजाने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले, यासह त्याच्या नावावर एक अनोखा विक्रमही झाला आहे.

Pranali Kodre

IPL 2024, CSK vs PBKS: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत बुधवारी (१ मे) 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) खेळला जात आहे.

या सामन्यात चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत.मथिशा पाथिरानाला छोटी दुखापत आहे आणि तुषार देशपांडे आजारी आहे. त्यामुळे हे दोघेही या सामन्याला मुकले आहे.

त्याचमुळे त्यांच्या जागेवर शार्दुल ठाकूर आणि रिचर्ड ग्लिसन या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शार्दुलचे पुनरागमन झाले आहे, तर रिचर्ड ग्लिसन या सामन्यातून पदार्पण करत आहे.

यामुळे पदार्पणाच्या सामन्यातच ग्लिसनच्या नावावर एल अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा वयस्कर खेळाडू ठरला आहे. बुधवारी जेव्हा ग्लिसनचे पदार्पण झाले, तेव्हा त्याचे वय ३६ वर्षे १५१ दिवस होते. या यादीत त्याच्यावर सिकंदर रझा आहे. रझाने गेल्यावर्षी म्हणजे आयपीएल २०२३ मध्ये पंजाब किंग्सकडून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले होते, त्यावेळी त्याचे वय ३६ वर्षे ३४२ दिवस होते.

आयपीएलमध्ये पदार्पण करणारे सर्वात वयस्कर खेळाडू

36 वर्षे 342 दिवस - सिकंदर रझा

36 वर्षे 151 दिवस - रिचर्ड ग्लिसन

35 वर्षे 44 दिवस - इम्रान ताहिर

34 वर्षे 124 दिवस - जलज सक्सेना

34 वर्षे 63 दिवस - केशव महाराज

ग्लिसन बदली खेळाडू

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ग्लिसन हा चेन्नई संघात डेवॉन कॉनवेचा बदली खेळाडू म्हणून दाखल झाला आहे. कॉनवे दुखापतीमुळे आयपीएलच्या १७ व्या हंगामातून बाहेर झाला आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज असलेल्या ग्लिसनला ९० टी२० सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने ९० टी२० सामन्यांत १०१ विकेट्स घेतल्या आहेत. ३३ धावांत ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. (Richard Gleeson Second Oldest Debutant in IPL)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT