IPL 2023 Tushar Deshpande on Rohit Sharma  
IPL

IPL 2023 : "हे सगळं फेक!" रोहितबद्दल पसरलेल्या अफवेवरून CSKच्या तुषार देशपांडेचा मोठा खुलासा

Kiran Mahanavar

IPL 2023 Tushar Deshpande on Rohit Sharma : आयपीएलमध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळल्या गेले. सामन्यानंतर तुषार देशपांडेचे एक वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या वक्तव्यात तुषारने रोहित शर्माबद्दल असभ्य टिप्पणी केल्याचा उल्लेख केला जात आहे. सोशल मीडियावरही तुषार देशपांडे यांच्यावर क्रिकेट चाहत्यांकडून टीका होत होती. आता सीएसकेच्या या मध्यमगती गोलंदाजाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामन्यात सीएसकेचा गोलंदाज तुषार देशपांडेने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर सोशल मीडियावर यावर एक वक्तव्य समोर आले. यामध्ये तुषारने रोहित शर्माची विकेट घेणे खूप सोपे असल्याचे सांगितले. तो विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्ससारखा नाही.

तुषारने हे विधान पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. रविवारी रात्री इन्स्टा स्टोरीमध्ये त्याने सोशल मीडियावर चालणाऱ्या अशा बातम्यांचे स्क्रीनशॉट घेतले आणि त्यावर थ्रोबॅक लिहिले. तुषारने आपल्या स्पष्टीकरणात असेही लिहिले आहे की, 'वर उल्लेख केलेल्या सर्व दिग्गज खेळाडूंचा मला पूर्ण आदर आहे. मी अशी अपमानास्पद विधाने कधीच दिली नाहीत आणि देणारही नाहीत. अशा खोट्या बातम्या पसरवणे थांबवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT