IPL

IPL 2023: पहिल्या क्वालिफायरमध्ये CSKचा Playing 11 मोठा बदल! कर्णधार धोनी 'या' खेळाडूंना देणार संधी

धोनी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल करत नाही पण ...

Kiran Mahanavar

CSK vs GT Qualifier 1 : आयपीएल 2023 पहिल्या क्वालिफायरमध्ये आज (23 मे) चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातच आयपीएल 2023 चा पहिला फायनलमध्ये जाणार संघ मिळले. दोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंची फौज आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके 12व्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. चेन्नई संघाने 9 अंतिम सामने खेळले आहेत, त्यापैकी 4 जिंकले आहेत. सीएसके संघाने प्लेऑफमध्ये 24 सामने खेळले असून त्यापैकी 15 सामने जिंकले आहेत. आता चेन्नईचा संघ गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

धोनी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल करत नाही, पण या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन कशी असेल पाहू?

ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी आयपीएल 2023 मध्ये सीएसके संघासाठी शानदार खेळी खेळली आहे. हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहेत. गायकवाडने 14 सामन्यांमध्ये 504 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कॉनवेने 14 सामन्यात 585 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत हे दोन्ही खेळाडू गुजरात टायटन्सविरुद्ध ओपनिंग करताना दिसू शकतात.

अजिंक्य रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. रहाणेने आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने आयपीएल 2023 च्या 11 सामन्यांमध्ये 282 धावा केल्या आहेत आणि तो 169.88 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत आहे. शिवम दुबेला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळू शकते. धोनीच्या नेतृत्वाखाली त्याची कामगिरी सर्वांसमोर आली आहे. आयपीएल 2023 मध्ये तो CSK संघासाठी मधल्या फळीतील महत्त्वाचा दुवा असल्याचे सिद्ध झाले आहे.

पाचव्या क्रमांकावर मोईन अली आणि सहाव्या क्रमांकावर रवींद्र जडेजाला संधी मिळू शकते. उत्कृष्ट गोलंदाजीसह क्रमवारीत उतरून वेगवान फलंदाजी करण्यातही हे खेळाडू माहीर आहेत. कर्णधार महेंद्रसिंग धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

दीपक चहर तुषार देशपांडे यांना संधी मिळू शकते. तिसरी वेगवान गोलंदाज म्हणून मतिशा पाथिरानाचा समावेश केला जाऊ शकतो. पाथीरानाने चेन्नईसाठी अनेक सामने आपल्या यॉर्कर चेंडूंनी जिंकले आहेत. त्याचबरोबर महेश तिक्ष्णा यांच्याकडे फिरकी विभागाची जबाबदारी येऊ शकते.

गुजरात टायटन्स विरुद्ध सीएसकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेश तिक्षना, मतिषा पाथीराना, दीपक चहर, तुषार देशपांडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT