IPL 2023 Playoffs Chances Qualification Scenarios : आयपीएल 2023 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. संघांसाठी प्लेऑफची लढाई दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे. अशा स्थितीत बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर काही संघांचे टेन्शन आणखीनच दुपटीने वाढले आहे. खरं तर, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर आयपीएलमधील काही संघांचा प्रवास जवळपास संपला आहे. या संघांसाठी आता पुनरागमन करणे खूप कठीण काम असेल.
आयपीएलचा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेला. या सामन्यात सीएसकेने दिल्ली संघाचा 27 धावांनी पराभव केला. सीएसकेच्या विजयानंतर दिल्लीसह काही संघांचे टेन्शन वाढले आहे. खरं तर हा सामना जिंकल्यानंतर सीएसकेने गुजरात टायटन्सनंतर प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. अशा स्थितीत प्लेऑफमध्ये जाण्यासाठी फक्त दोनच जागा उरल्या आहेत.
मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे उर्वरित दोन स्थानांसाठी लढत आहेत. अशा परिस्थितीत आयपीएल 2023 मधील उर्वरित दोन संघ सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्रवास जवळपास संपला आहे. सनरायझर्सकडे संधी कमी असली तरी. मात्र दिल्लीचा संघ पूर्णपणे बाहेर झाला आहे.
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आता आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये जाणे जवळपास निश्चित आहे. हे दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. गुजरात टायटन्सने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत, तर सीएसकेने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. जिथे त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. याशिवाय या दोन्ही संघांना 99.6% (गुजरात टायटन्स) आणि 98% (चेन्नई सुपर किंग्ज) प्लेऑफमध्ये पात्र होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत हे दोन्ही संघ प्रथमच प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.