IPL

SRH vs DC: हैदराबादने ठोकली पराभवाची हॅट्ट्रिक! दिल्लीचा सलग दुसरा विजय, अक्षर-कुलदीपने दाखवली ताकद

सकाळ ऑनलाईन टीम

SRH vs DC IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर एका रोमांचक सामन्यात पराभूत केले. दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून आयपीएल 2023 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला आहे.

हैदराबाद संघाला 145 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 गडी गमावून 144 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांनी 34-34 धावा केल्या. या दोघांशिवाय कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 21 धावा केल्या. आयपीएल 2023 मधील हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव आहे.

145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवातही चांगली झाली नाही. हॅरी ब्रूक पुन्हा अयशस्वी ठरला आणि तो 7 धावा करून बाद झाला. मयंक अग्रवालचाही कॅच ड्रॉप झाला आणि या लाईफलाइनचा फायदा घेत त्याने 49 धावांची खेळी खेळली. पॉवरप्लेमध्ये हैदराबादने 1 गडी गमावून 36 धावा केल्या. पण, त्यानंतर संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. यामुळे संघ दडपणाखाली आला आणि संघाने सामना गमावला.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात भुवनेश्वरने फिलिप सॉल्टला यष्टिरक्षक क्लासेनवी झेलबाद केले. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी दुसऱ्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली. मिशेलला टी नटराजनने एलबीडब्ल्यू आऊट केले. मार्शला 15 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 25 धावा करता आल्या.

यानंतर वॉशिंग्टन सुंदरची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. आठव्या षटकात त्याने तीन बळी घेतल्या. सर्वप्रथम सुंदरने वॉर्नरला हॅरी ब्रूककरवी झेलबाद केले. त्याला 20 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 21 धावा करता आल्या. सरफराजने खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. त्याने भुवनेश्वरकडे झेल सोपवला. सर्फराजला नऊ चेंडूत 10 धावा करता आल्या. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अमन हकीम खानही बाद झाला.

62 धावांत पाच विकेट पडल्यानंतर मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांनी सहाव्या विकेटसाठी 60 चेंडूत 69 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेल 18व्या षटकात बाद झाला. त्याला भुवनेश्वरने क्लीन बोल्ड केले. अक्षरने 34 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 34 धावांची खेळी खेळली. यानंतर मनीष पांडे धावबाद झाला. त्याला 27 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 34 धावा करता आल्या.

भुवनेश्वरने चार षटकांत 11 धावा देत दोन बळी घेतल्या. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरने चार षटकांत 28 धावा देत तीन बळी घेतल्या. टी नटराजनने तीन षटकांत 21 धावा देत मिचेल मार्शची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT