David Warner Touches Bhuvneshwar Kumar Feet Heartwarming  
IPL

IPL 2023,SRH vs DC: अन् अचानक वॉर्नरने भुवनेश्वर कुमार पाय पकडले; Video व्हायरल

आयपीएलच्या विश्वात चर्चा सुरु आहे ती म्हणजे सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेविड वॉर्नरची.

धनश्री ओतारी

आयपीएल 2023 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर एका रोमांचक सामन्यात पराभूत केले. पण आयपीएलच्या विश्वात चर्चा सुरु आहे ती म्हणजे सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेविड वॉर्नरची. वॉर्नरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये वॉर्नरने भुवनेश्वर कुमारला खाली वाकुन नमस्कार करताना दिसत आहे. (David Warner Touches Bhuvneshwar Kumar Feet Heartwarming )

2021 पर्यंत वॉर्नर सनरायझर्सचा कर्णधार होता आणि त्याने या मैदानावर संघाचे नेतृत्वही केले होते. आता तो दिल्लीचा कर्णधार म्हणून या मैदानावर परतला आणि परत येताच त्याने आपल्या जुन्या साथीदाराच्या पायाला स्पर्श केला.

डेव्हिड वॉर्नर कर्णधार असताना भुवनेश्वर कुमार संघाचा उपकर्णधार होता. भुवनेश्वरने वॉर्नरच्या अनुपस्थितीत अनेकदा संघाचे नेतृत्व केले आहे. या दोघांची मैत्री घनिष्ठ आहे.

सोमवारी जेव्हा वॉर्नरने भुवनेश्वर कुमारला मैदानात पाहिले तेव्हा तो त्याच्याकडे धावला आणि त्याच्या पायाला स्पर्श करू लागला. भुवनेश्वर कुमारने त्याला उभे केले आणि नंतर दोघांनी मिठी मारली. दोघांचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

वॉर्नरला २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबादने सोडले होते. 2021 मध्ये, वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली नाही. याच कारणामुळे संघाने सीजनच्या मध्यावर वॉर्नरला हटवून केन विल्यमसनला कर्णधार बनवले. वॉर्नरलाही संघातून वगळण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT