Delhi Capitals | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024 DC vs MI : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

DC vs MI IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये शनिवारी 43 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरच्या षटकात रोमांचक विजय मिळवला.

Pranali Kodre

Delhi Capitals vs Mumbai Indians Result: 

शनिवारी (27 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत झालेल्या 43 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 10 धावांनी विजय मिळवला. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर झाला.

हा दिल्लीचा आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 10 सामन्यांतील पाचवा विजय ठरला. मात्र, मुंबईला 9 सामन्यांपैकी सहाव्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात दिल्लीने दिलेल्या 258 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 9 बाद 247 धावा करता आल्या.

मुंबईकडून तिलकने सर्वाधिक 63 धावा केल्या, तसेच हार्दिक पांड्याने 46 धावा केल्या. दिल्लीकडून गोलंदाजीत मुकेश कुमार आणि रसिख दार सलाम यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच खलील अहमदने 2 विकेट्स घेतल्या.

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीचा मुंबईविरुद्ध अखेरच्या षटकात विजय

अखेरीस तिलक बाद झाल्यानंतर ल्युक वूड आणि पीयुष चावलाने मुंबईला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, अखेरच्या चेंडूवर 11 धावांची गरज असल्याने दिल्लीचा विजय निश्चित झाला.

त्यातच अखेरच्या चेंडूवर पीयुष चावला शाय होपकडे झेल देत 10 धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबईचा डाव 20 षटकात 9 बाद 247 धावांवर संपला. त्यामुळे हा सामना दिल्लीने 10 धावांनी जिंकला.

IPL 2024 DC vs MI Live Score : अर्धशतक करणारा तिलक वर्मा रनआऊट, सामना रोमांचक वळणावर

अखेरच्या षटकात मुंबईला 25 धावांची गरज होती. त्यामुळे अर्धशतक केलेल्या तिलक वर्माने मोठा फटका खेळला. पण सुमीतने कुमारने चेंडू रोखत यष्टीरक्षक पंतकडे फेकला. यावेळी पंतने लगेचच स्टंपवरील बेल्स उडवले. तोपर्यंत तिलक क्रिजमध्ये पोहचला नव्हता. त्यामुळे तो धावबाद झाला. तिलकने 32 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 63 धावांची खेळी केली.

IPL 2024 DC vs MI Live Score : मोठा फटका खेळण्याच्या मोहम्मद नबीही बाद

आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात रसिखने टाकलेल्या 19 व्या षटकात मोहम्मद नबी बाद झाला. त्याने एक षटकारासह 7 धावा केल्या.

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

तिलक वर्माची साथ देताना टीम डेविडने आक्रमक खेळ केला होता. त्यामुळे त्याने 18 व्या षटकात पहिल्या तीन चेंडूत दोन षटकार आणि एक चौकार मारला. परंतु, चौथ्या चेंडूवर त्याला मुकेश कुमारने पायचीत पकडले. त्याने डीआरएसचा वापर केला. पण त्याचही डेविड बाद असल्याचे दिसले.

त्यामुळे त्याला 2 चौकार आणि 3 षटकारांसह 17 चेंडूत 37 धावा करून माघारी परतावे लागले. दरम्यान, त्याच्या आक्रमणामुळे मुंबईने 18 षटकात 6 बाद 217 धावा केल्या. मुंबईला अखेरच्या 12 चेंडूत 41 धावांची गरज आहे.

IPL 2024 DC vs MI Live Score : तिलक वर्माचे अर्धशतक! टीम डेविडचीही फटकेबाजी; मुंबई मिळवणार विक्रमी विजय?

एकीकडून विकेट जात असताना तिलक वर्माने दुसऱ्या बाजूने चांगली फलंदाजी करत 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, त्याला टीम डेविडची चांगली साथ मिळाली. डेविडने आक्रमक खेळ केला. त्यामुळे मुंबईने 16 षटकात 5 बाद 187 धावा केल्या.

IPL 2024 DC vs MI Live Score : रसिखच्या एकाच षटकात दोन विकेट्स; हार्दिकचं अर्धशतकही हुकलं, मुंबईचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

पॉवर-प्लेमध्येच तीन विकेट्स गमावल्यानंतर मुंबईचा डाव तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पांड्याने सावरला होता. त्यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. परंतु, त्यांची जोडी अखेर 13 व्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणाऱ्या रसिख दार सलामने तोडली.

त्याने या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिकला 46 धावांवर मुकेश कुमारच्या हातून झेलबाद केले. हार्दिकने 24 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह ही खेळी केली. तो बाद झाल्यानंतर पाचव्या चेंडूवर रसिखने नेहल वढेरालाही माघारी धाडले. वढेरा 4 धावा करून बाद झाला. त्यामुळे तिलकला साथ देण्यासाठी टीम डेव्हिड फलंदाजीला आला आहे.

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला तगडा झटका! खलीलने आक्रमक खेळणाऱ्या सूर्यकुमारचा अडथळा केला दूर

ईशान बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने आक्रमक पवित्रा स्विकारला होता. त्याने मोठे फटके खेळले, मात्र त्याचा अडथळा 6 व्या षटकात खलील अहमदने दूर केला. विशेष म्हणजे याच षटकात सूर्यकुमारने बाद होण्यापूर्वी एक चौकार आणि एक षटकार मारला होता.

सूर्यकुमारने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 13 चेंडूत 26 धावा केल्या. त्याच्या विकेटसह 6 षटकेही पूर्ण झाल्याने पॉवर-प्ले संपला. पॉवर-प्लेमध्ये मुंबईने 3 विकेट्स गमावत 65 धावा केल्या.

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का! रोहितपाठोपाठ ईशान किशनही परतला माघारी

रोहित बाद झाल्यानंतर लगेचच पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुकेश कुमारने ईशान किशनचा अडथळा दूर केला. ईशानने मुकेशविरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्याचा झेल अक्षर पटेलने घेतला. त्यामुळे ईशानला 14 चेंडूत 20 धावा करून माघारी परतावे लागले.

ईशान बाद झाल्यानंतर तिलक वर्मा मैदानात आला आहे. त्यामुळे सध्या सूर्यकुमार यादवसह तिलक फलंदाजी करत आहे.

IPL 2024 DC vs MI Live Score : खलील अहमदने दिला मुंबईला पहिला झटका; सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद

दिल्लीने दिलेल्या 258 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीला उतरले होते. त्यांनी चांगली सुरुवातही केली होती. ईशान आक्रमक खेळत होता, तर दुसरी बाजू रोहितने सांभाळली होती.

परंतु, रोहितला खलील अहमदलने बाद केले. चौथ्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शाय होपकडे झेल देत बाद झाला. रोहितने 8 चेंडूत 8 धावा केल्या.

IPL 2024 DC vs MI Live Score : फ्रेझर-मॅकगर्कची वादळी खेळी अन् स्टब्स-होपचेही आक्रमण; दिल्लीचे मुंबईसमोर 258 धावांचे आव्हान

आयपीएलमध्ये शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात अखेरच्या षटकात दिल्लीसाठी अक्षर (11) आणि स्टब्सने मिळून 17 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने 20 षटकात 4 बाद 257 धावा केल्या आणि मुंबईसमोर 258 धावांचं लक्ष्य ठेवलं.

दिल्लीकडून जॅर फ्रेझर-मॅकगर्कने सर्वाधिक 84 धावा केल्या, तर ट्रिस्टर्न स्टब्सने 48 धावा केल्या, तर शाय होपने 41 धावा केल्या.

मुंबईकडून जसप्रीत बुमराह, ल्यूक वूड, पीयुष चावला आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2024 DC vs MI Live Score : बुमराहने ऋषभ पंतला धाडलं माघारी; दिल्ली पार करणार अडीचशे धावांचा टप्पा?

होप बाद झाल्यानंतर ऋषभ पंतला साथ देण्यासाठी ट्रिस्टर्न स्टब्स आला. एक बाजू पंतने सांभाळलेली असताना स्टब्सने फटकेबाजी केली. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली.

परंतु, पंतला बाद करत जसप्रीत बुमराहने ही जोडी फोडली. पंतचा झेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रोहित शर्माने पकडला. त्यामुळे पंतला 19 चेंडूत 29 धावा करून माघारी परतावे लागले. तो बाद झाल्यानंतर अक्षर पटेल फलंदाजीला आला आहे.

दिल्लीने 19 षटकात 4 बाद 240 धावा केल्या आहेत

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

दिल्लीचे सलामीवीर बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि शाय होपने डाव सांभाळला होता. परंतु, अर्धशतकासाठी अवघ्या 9 धावा हव्या असताना होपला ल्युक वूडने बाद केले. होपचा झेल 41 धावांवर तिलक वर्माने पकडला.

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीला दुसरा मोठा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले पॅव्हेलियनमध्ये

फ्रेझर मॅकगर्कनंतर त्याच्यासह चांगला खेळणारा अभिषेक पोरेल 10 व्या षटकात बाद झाला. त्याचा मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक ईशान किशनने झेल घेतला. तो 27 चेंडूत 36 धावांवर बाद झाला.

त्याच्यानंतर कर्णधार ऋषभ पंत फलंदाजीला आला आहे. 10 षटकात दिल्लीने 2 बाद 128 धावा केल्या आहेत.

IPL 2024 DC vs MI Live Score : अखेर मुंबईला मिळालं पहिलं यश; आक्रमक खेळणाऱ्या फ्रेझर-मॅकगर्कचं शतक हुकलं

दिल्लीकडून सलामीवीर फ्रेझर-मॅकगर्कने आक्रमक सुरुवात केली होती. त्याच्या शतकामुळे दिल्लीने 7 षटकातच 100 धावांचा टप्पा पार केला होता. मात्र 8 व्या षटकात पीयुष चावलाने फ्रेझर-मॅकगर्कचा अडथळा दूर केला. त्याचा झेल डीप मिडविकेटला मोहम्मद नबीने पकडला.

त्यामुळे फ्रेझर-मॅकगर्क 27 चेंडूत 84 धावा करून बाद झाला या खेळीत त्याने 11 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याचे शतक अवघ्या 16 धावांनी हुकले.

IPL 2024 DC vs MI Live Score : फ्रेझर-मॅकगर्कचं तुफानी अर्धशतक, दिल्लीची मुंबईविरुद्ध आक्रमक सुरुवात

फ्रेझर-मॅकगर्कने आक्रमक खेळताना अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या हंगामातील त्याचे हे तिसरे अर्धशतक असून त्याने दुसऱ्यांदा १५ चेंडूत अर्धशतक केले आहे. त्याच्या अर्धशतकामुळे दिल्लीला मुंबईविरुद्ध आक्रमक सुरुवात मिळाली आहे. ४ षटकातच दिल्लीने बिनबाद ६९ धावा चोपल्या आहेत.

IPL 2024 DC vs MI Live Score : सामन्याला सुरुवात! दिल्लीची मुंबईविरुद्ध आक्रमक सुरुवातीलाच फटकेबाजी

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीकडून जॅक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल हे सलामीला फलंदाजीला उतरले आहेत. दरम्यान फ्रेझरने आक्रमक सुरुवात केली असून त्याने पहिल्याच षटकात १९ धावा चोपल्या आहेत

IPL 2024 DC vs MI Live Score : जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग-11

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वूड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय : सूर्यकुमार यादव, नमन धीर, शम्स मुलानी, देवाल्ड ब्रेविस, कुमार कार्तिकेय

दिल्ली कॅपिटल्स : जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय : रसिख दार सलाम, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, रिकी भुई, सुमित कुमार

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! दोन्ही संघात मोठे बदल

आयपीएल २०२४ मध्ये शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.

दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. दिल्लीने पृथ्वी शॉच्या जागेवर कुमार कुशाग्रला संधी दिली आहे, तर मुंबईने गेराल्ड कोएत्झीच्या जागेवर ल्युक वूडला संधी दिली आहे. कोएत्झीला पोटात वेदना होत असल्याने या सामन्याला मुकावे लागले आहे

Delhi Capitals Vs Mumbai Indians Live Score Updates : आयपीएल 2024 मध्ये शनिवार हा डबल हेडर म्हणजेच दोन सामने होणार आहेत. शनिवारी पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गेल्या वेळी दोघेही आमनेसामने आले होते. मुंबईने हा सामना 29 धावांनी जिंकला होता.

मुंबई इंडियन्स संघासाठी आतापर्यंतचा हा मोसम काही खास राहिलेला नाही. या संघाने 8 सामने खेळले असून त्यापैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. तर दिल्लीचा संघ नऊ सामन्यांत चार विजयांसह सहाव्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT