DC vs GT LIVE  ESAKAL
IPL

DC vs GT : दिल्ली गुजरातच्या आवाक्याबाहेरच! राशिद शेवटपर्यंत लढला मात्र शेवटच्या चेंडूवर मुकेश जिंकला

अनिरुद्ध संकपाळ

DC vs GT Live : दिल्ली गुजरातच्या आवाक्याबाहेरच! राशिद शेवटपर्यंत लढला मात्र शेवटच्या चेंडूवर मुकेश जिंकला

दिल्ली कॅपिटल्सचे 225 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतलेल्या गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. साई किशोर आणि डेव्हिड मिलर यांनी सामना आवाक्यात आणल्यानंतर राशिद खानने दिल्लीला मात देण्याचा शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केला. मात्र एका चेंडूवर 5 धावांची गरज असताना मुकेश कुमारने टिच्चून मारा करत गुजरातच्या हातून विजय हिसकावून घेतला.

DC vs GT Live IPL 2024 : शेवटच्या षटकात ऋषभ पंतची धडाकेबाज फलंदाजी; गुजरातसमोर उभारलं 225 धावांच आव्हान

ऋषभ पंत आणि अक्षर पटेलने 113 धावांची भागीदारी रचल्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये पंतने चांगलेच तडाखे दिले. त्याने मोहित शर्माच्या शेवटच्या षटकात तब्बल 31 धावा ठोकून दिल्लीला 20 षटकात 4 बाद 224 धावांपर्यंत पोहचवलं. पंतने 43 चेंडूत 88 धावांची तर स्टब्सने 7 चेंडूत 26 धावा चोपल्या.

DC vs GT Live IPL 2024 : अक्षर पटेल अन् ऋषभ पंतनं डाव सावरला; दिल्लीची शतकाकडे कूच

दिल्ली कॅपिट्लसचा कर्णधार ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी दिल्लीला शतकाच्या जवळ पोहचवलं आहे. संदीप वॉरियरनं दिल्लला तीन धक्के दिल्यानंतर या दोघांनी भागीदारी रचत दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

DC vs GT Live IPL 2024 : पॉवर प्लेमध्ये दिल्लीची खराब सुरूवात, दोन्ही सलामीवीर माघारी

पॉवर प्लेमध्ये दिल्लीची खराब सुरूवात झाली आहे. पृथ्वी शॉ 11 तर जॅक फ्रेजर मॅग्कर्ग 23 धावा करून बाद झाला. दिल्लीने तरीही 5 षटकात 43 धावांपर्यंत मजल मारली आहे.

गुजरातने जिंकली नाणेफेक 

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शुभमन गिलचा हा 100 वा आयपीएल सामना आहे.

दिल्ली विरूद्ध गुजरात - हेड टू हेड 

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांनी आतापर्यंत 4 सामने खेळले असून त्यातील दोन सामने दिल्लीने तर दोन सामने गुजरातने जिंकले आहेत. दिल्लीनं दोन्ही सामने अहमदाबादमध्ये जिंकले होते हे विशेष

Delhi Capitals Vs Gujarat Titans Live Cricket Score IPL 2024: 

दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा 4 धावांनी पराभव करत गुणतालिकेत दोन स्थानांची उसळी घेतली. दिल्लीने गुजरातसमोर विजयासाठी 225 धावांचे आव्हान ठेवले होते. गुजरातनेही सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला मात्र मुकेश कुमारने एका चेंडूत 5 धावांची गरज असताना चेंडू निर्धाव टाकत सामना दिल्लीला जिंकून दिला.

गुजरातकडून राशिद खानने शेवटपर्यंत झुंज देत 11 चेंडूत 21 धावा ठोकल्या. तर साई किशोर 65 धावा आणि डेव्हिड मिलरने 23 चेंडूत 55 धावा करत दिल्लीला मोठं टेन्शन दिलं होतं. दिल्लीकडून रिसिख दर सलमानने भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या.

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 4 बाद 224 धावांचा डोंगर उभारला. पॉवर प्लेमध्ये दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर अक्षर पटेलने दिल्लीचा डाव सावरला. त्यानं बढती मिळाल्याचा फायदा उचलला. पंतसोबत त्यानं तिसऱ्या विकेटसाठी 113 धावांची दमदार भागीदारी रचली. अक्षर 66 धावा करून बाद झाल्यानंतर पंतने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली.

ट्रिस्टन स्टब्स आणि पंतने शेवटच्या तीन षटकात तब्बल 67 धावा चोपल्या. पंतने 88 धावांची नाबाद खेळी केली तर स्टब्सने अवघ्या 7 चेंडूत नाबाद 26 धावा चोपल्या. गुजरातकडून संदीप वॉरियरने दिल्लीला तीन धक्के दिले. तर नूर अहमदनं अक्षर पटेलला बाद केलं. मोहित शर्माने 4 षटकात 73 धावांची खैरात लुटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT