Sanju Samson | DC vs RR | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024, DC vs RR: संजू सॅमसन राजस्थानसाठी लढला, पण दिल्लीनं घरच्या मैदानात मारली बाजी

IPL 2024, DC vs RR: आयपीएल 2024 मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात संजू सॅमसनची विकेट टर्निंग पाँइट ठरली.

Pranali Kodre

IPL 2024, DC vs RR: क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जात... याचाच प्रत्यय आयपीएलमध्ये मंगळवारी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यात आला. दिल्लीचं घरचं मैदान असलेल्या या स्टेडियमवर मोठ्या धावा होतात, त्यानुसार हा सामनाही मोठ्या धावांचा झाला, ज्यात दिल्लीने 20 धावांनी बाजी मारली.

राजस्थानसाठी संजू सॅमसनची वादग्रस्त विकेट टर्निंग पाँइंट ठरली. शाय होपने बाउंड्री लाईनजवळ त्याचा कॅच पकडला आणि दिल्लीलाही होप दिल्या.

या सामन्यात सॅमसनने टॉस जिंकून दिल्लीला पहिल्यांदा बॅटिंगला बोलावलं होतं. दिल्लीकडून तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या जॅक फ्रेझर-मॅकगर्कने याही सामन्यात आक्रमण केलं आणि तो अवघ्या 20 चेंडूत 50 धावा करून बाद झाला.

त्यानंतरही अभिषेक पोरेलनंही आक्रमक 65 धावांची खेळी केली. तरी आर अश्विनने 3 विकेट्स घेत दिल्लीच्या धावगतीला लगाम घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेवटी ट्रिस्टन स्टब्सने 20 चेंडूत 41 धावा फटकावल्या. त्यामुळे दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 221 धावा उभ्या केल्या.

त्यानंतर राजस्थानने पहिली विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये जैस्वालच्या रुपात गमावली. त्यामुळे सॅमसनला पहिल्या ओव्हरमध्ये मैदानात उतरावं लागलं. त्यानं जॉस बटलर, रियान पराग आणि शुभमन दुबे यांच्याबरोबर चांगल्या भागीदारीही केल्या.

यादरम्यान त्याने आक्रमक खेळताना 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं आणि तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. त्याच्या खेळामुळे त्यामुळे राजस्थानने 15 षटकांच्या आतच 150 धावांचा टप्पा गाठला होता, त्यामुळे राजस्थानच्या विजयाच्या आशा उंचावलेल्या होत्या.

पण याचवेळी 16 वं षटक टाकण्यासाठी मुकेश कुमार आला. त्यानं टाकलेल्या चौथ्या चेंडूवर सॅमसननं लाँग ऑनला शॉट मारला, पण... पण तिथे असलेल्या शाय होपने अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ कॅच घेतला. तो कॅच घेताना पाय बाउंड्री लाईनला लागणार नाही, याची सावधगिरीही बाळगताना दिसला.

या कॅचचा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवण्यात आला. थर्ड अंपायरच्या मते तो कॅच योग्य होता, पण संजू सॅमसन अन् राजस्थान रॉयल्स संघ मात्र यावर अत्यंत निराश दिसले. त्यांच्यामते होपचा पाय बाउंड्री लाईनला लागला होता.

हा क्षण सामन्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. त्याचमुळे दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांचाही उत्साह देखील शिगेला पोहचलेला दिसला. या विकेटबद्दल बरीच चर्चाही नंतर झाली. पण अंपायरने दिलेला निर्णय खेळाडूंना मान्य करावाच लागतो.

त्यामुळे सॅमसन 46 चेंडूत 86 धावा करून माघरी परतला अन् नंतरच्या 4 षटकात राजस्थानने आणखी चार विकेट्स गमावल्या. त्यामुळे त्यांना 20 ओव्हरमध्ये 8 बाद 201 धावाच करता आल्या.

दरम्यान, दिल्लीच्या या विजयाने मात्र आता प्लेऑफची शर्यत मोठी रंगतदार झाली आहे. चार संघ 12 पाँइंट्सवर आहेत, त्यामुळे आता प्लेऑफसाठी मोठी चूरस आगामी सामन्यांमध्ये पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT