Rohit Sharma - Hardik Pandya, Viral Video: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत रविवारी (२४ मार्च) गुजरात टायटन्स संघाने मुंबई इंडियन्सला ६ धावांनी पराभूत केले. हा सामना हार्दिक पंड्याचा मुंबई इंडियन्सचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता.
मात्र त्याच्यासाठी पहिल्या सामन्यातील अनुभव फारसा चांगला नव्हता. त्यातच सामन्यानंतर त्याचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यामुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हार्दिकने गेल्या दोन हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते. त्यानंतर त्याला गुजरातने मुंबई इंडियन्सला ट्रेड केले. याबरोबरच मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवत हार्दिकला ही जबाबदारी दिली.
मात्र ही गोष्ट चाहत्यांना फारशी पसंत पडली नसल्याचे दिसून आले आहे. गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यातही हार्दिक नाणेफेकीसाठी गेलेला असताना चाहत्यांनी त्याची हुर्यो उडवली. तसेच चाहत्यांकडून रोहितच्या नावाने सातत्याने घोषणाबाजीही करण्यात येत होती.
याशिवाय जेव्हा सामना संपला, त्यानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रोहित शर्मा हार्दिकवर काहीसा चिडलेला दिसत आहे. व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे रोहित गुजरात टायटन्सच्या खेळाडूंबरोबर बोलत असताना हार्दिकने रोहितला मागून येत मिठी मारली. त्यानंतर रोहित त्याला दूर करताना काहीसा वैतागलेला दिसत आहे.
तसेच त्याच्याशी बोलताना काही चिडताना दिसत आहे. यावेळी मुंबई इंडियन्सचा संघमालक आकाश अंबानीही तिथे उभा असलेला दिसतो. पण रोहित आणि हार्दिक यांच्यातील संभाषण पाहिल्यानंतर तो राशिद खानशी बोलत दुसरीकडे जाताना दिसत आहे.
त्यामुळे मुंबई इंडियन्स संघात सर्व अलबेल नसल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. मात्र, हार्दिक आणि रोहित यांच्यातील वादाच्या चर्चा होत असल्या तरी याची पुष्टी सकाळ करत नाही.
या सामन्यादरम्यान गेराल्ड कोएत्झीच्या गोलंदाजीवेळी हार्दिकने रोहित शर्माचे क्षेत्ररक्षण सातत्याने बदलताना दिसत होता. त्याने त्याला लाँग-ऑनला क्षेत्ररक्षणासाठी पाठवले होते. मात्र, हे बदल करताना हार्दिकचे हावभाव पाहून चाहत्यांनी त्याला ट्रोल केले.
या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शनने 45 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार शुभमन गिलने 31 धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 बाद 162 धावा करता आल्या. मुंबईकडून डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक 46 धावा केल्या, तर रोहित शर्माने ४३ धावांची खेळी केली.
याशिवाय कोणाला खास काही करता आले नाही. गुजरातकडून अझमतुल्लाह ओमरझाई, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.