Rohit Sharma on Dinesh Karthik T20 World Cup News sakal
IPL

IPL 2024 : दिनेश कार्तिक खेळणार टी-20 वर्ल्ड कप? MI vs RCB सामन्यादरम्यान रोहित शर्माचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma on Dinesh Karthik T20 World Cup : इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात 11 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला.

Kiran Mahanavar

Rohit Sharma on Dinesh Karthik T20 World Cup : इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात 11 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सने हा सामना 7 विकेट्सने एकतर्फी जिंकला. पण या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आरसीबीचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकला टी-20 वर्ल्ड कप खेळण्यावरून बोलत आहे.

दिनेश कार्तिकने वयाच्या 38 व्या वर्षी अप्रतिम खेळी करून क्रिकेट चाहत्यांना आपले चाहते बनवले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कार्तिकने 23 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकार ठोकले आणि 230 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने नाबाद 53 धावा केल्या.

दरम्यान, जेव्हा तो स्टायलिश शॉट्स खेळत होता, तेव्हा रोहित शर्मा त्याच्याकडे गेला आणि टाळ्या वाजवत म्हणाला – शाब्बास डीके, वर्ल्ड कप खेळायचा आहे, वर्ल्ड कप. यानंतर तो हसताना दिसत आहे. चालू हंगामात दिनेश कार्तिकने 38, 28, 20, 4 आणि 53 धावांची खेळी खेळली आहे.

डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी

कार्तिकबद्दल बोलायचे झाले तर... तो एक उत्कृष्ट फिनिशर आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याचा स्ट्राइक रेट 189 पेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत कार्तिकला कारकिर्दीसाठी शेवटची संधी दिली जाऊ शकते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

दिनेश कार्तिक 2008 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने 248 आयपीएल सामन्यांमध्ये 4659 धावा केल्या आहेत ज्यात 21 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 97 आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, पंजाब किंग्ज इलेव्हन, मुंबई इंडियन्स, केकेआर आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने मुंबईला 197 धावांचे लक्ष्य दिले. आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 61 धावा केल्या. रजत पाटीदारने 50 आणि दिनेश कार्तिकने 53 धावांचे योगदान दिले. विराट कोहली अवघ्या 3 धावा करून बाद झाला. यानंतर ग्लेन मॅक्सवेलला खातेही उघडता आले नाही.

प्रत्युत्तरात मुंबईने 15.3 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. इशान किशनने 34 चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 69 धावा, रोहित शर्माने 24 चेंडूत 38 धावा आणि सूर्यकुमार यादवने 19 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. कर्णधार हार्दिक सहा चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला तर तिलक वर्मा 10 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT