Dinesh Karthik | RCB | IPL 2024 Sakal
IPL

RCB साठी लढलेल्या दिनेश कार्तिकचं प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या गजरात कौतुक, चिन्नास्वामी मैदानातील Video Viral

Dinesh Karthik Video: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बेंगळुरू संघाला विजय मिळवून देण्यासाठी झुंजार खेळी करणाऱ्या दिनेश कार्तिकचं प्रेक्षकांकडूनही खास कौतुक करण्यात आले.

Pranali Kodre

Dinesh Karthik Viral Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 30 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनराझर्स हैदराबाद संघात झाला. सोमवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने 25 धावांनी रोमांचक विजय मिळवला.

असे असले तरी या सामन्यात बेंगळुरूसाठी झुंजार खेळी केलेल्या यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेही सर्वांची वाहवा मिळवली.

सनरायझर्स हैदराबादने बेंगळुरूसमोर विजयासाठी 288 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगळुरूला 20 षटकात 7 बाद 262 धावा करता आल्या. त्यामुळे अवघ्या विजयासाठी 26 धावा कमी पडल्या.

दरम्यान, बेंगळुरूकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी चांगली सुरुवात दिल्यानंतर मात्र मधली फळी कोलमडली होती. एकाक्षणी बेंगळुरूची परिस्थिती 122 धावांवर 5 विकेट्स अशी होती. परंतु, अशा परिस्थितीत दिनेश कार्तिकने जबाबदारी हातात घेतली आणि हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने 23 चेंडूतच अर्धशतक झळकावले.

त्यानंतरही त्याने प्रहार करणे सुरू ठेवले होते. परंतु, आधीच जास्त विकेट्स गेल्याने 288 या डोंगराएवढ्या धावसंख्येचे समीकरण जुळणे कठीण झाले. अखेर 19 व्या षटकात कार्तिक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असतानाच टी नटराजनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेनकडे झेल देत बाद झाला.

तो बाद झाला, तेव्हा त्याने बेंगळुरूला 244 धावांपर्यंत पोहचवलं होतं. त्यामुळे पराभवाचे अंतर कमी करण्यात बेंगळुरूला यश आले. कार्तिक 35 चेंडूत 83 धावांची खेळी करून बाद झाला. 237 च्या स्ट्राईक रेटने केलेल्या या खेळीत त्याने 5 चौकार आणि 7 षटकार मारले.

दरम्यान, तो बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना त्याचे स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले. या क्षणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, या सामन्यात बेंगळुरूकडून विराट, डू प्लेसिस आणि कार्तिक व्यतिरिक्त फलंदाजी कोणाला फारशी चमक दाखवता आली नाही. हैदराबादकडून गोलंदाजीत कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, हैदराबादकडून ट्रेविस हेडने 41 चेंडूत 102 धावांची शतकी खेळी केली होती, तसेच हेन्रिक क्लासेनने 31 चेंडूत 67 धावांची खेळी केली.

याव्यतिरिक्त अभिषेक शर्मा (34), एडेन मार्करम (32) आणि अब्दुल सामद (37) यांनीही छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्यामुळे हैदराबादने 20 षटकात 3 बाद 287 धावा केल्या. बेंगळुरूकडून लॉकी फर्ग्युसनने 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT