Fact Check GT vs MI : अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यावेळी चाहत्यांनी नुसता राडा केला. टॉसवेळी हार्दिक पांड्याला गुजरातच्या चाहत्यांनी हूटिंग करत चांगलंच हैरान केलं होतं. रोहित-रोहितच्या घोषणांनी मैदान दणाणून गेलं होतं. त्यात सामना दोन्ही संघांनी चुरशीने खेळला. अखेर गुजरात टायटन्सने मुंबईचा 6 धावांनी पराभव करत पांड्याशिवाय देखील गुजरातचा संघ तगडा असल्याचे दाखवून दिले.
मात्र यादरम्यान प्रेक्षकांमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत प्रेक्षकांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचे दिसत आहे. काही नेटकरी हा व्हिडिओ रोहित अन् पांड्याचे चाहते एकमेकांना भिडले अशा कॅप्शनने व्हायरल करत आहेत. मात्र अहमदाबादच्या स्टेडियमवर खरंच असं काही घडलं आहे का?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन प्रेक्षकांमधील भांडण होतं. ते काही रोहितचे किंवा हार्दिकचे चाहते नव्हते. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर हाणामारी करणारे प्रेक्षकांकडून रोहित शर्मा किंवा हार्दिक पांड्याचा कोणताही उल्लेख होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रोहित अन् हार्दिकचे चाहते भिडले असं म्हणणं योग्य होणार नाही.
मुंबईच्या पहिल्या पराभवाबद्दल हार्दिक पांड्या म्हणाला की, 'आम्ही त्या 42 धावा चेस करण्यासाठी जोर लावला. आम्ही शेवटच्या पाच षटकात तुलनेने कमी धावा केल्या. आम्ही आमची लय गमावली. मला या स्टेडियमवर पुन्हा येऊन चांगलं वाटलं. इथं तुम्ही क्रिकेटचं वातावरण एन्जॉय करून शकता. इथले प्रेक्षक उत्साहाने भरलेले असतात. त्यांना आज चांगला सामना पहायला मिळाला.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.