Faf Du Plessis Statement After loss IPL 2024 Eliminator RCB sakal
IPL

Faf Du Plessis : RCBचे ट्रॉफीचे स्वप्न भंगले... पराभवाचं खरं कारण काय? कर्णधार फॅफने 'या' नियमाला धरले जबाबदार

Faf Du Plessis Reaction on RCB Lose : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाला सामोरे जावे लागले.

Kiran Mahanavar

RR vs RCB IPL 2024 Eliminator: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह आरसीबी ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. बेंगळुरूने या हंगामात कठोर परिश्रमानंतर पुनरागमन केले आणि सलग 6 सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरले. पण आता एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला राजस्थानविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवाने आरसीबीच्या करोडो चाहत्यांचे स्वप्न भंगले आहे.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने राजस्थानला केवळ 173 धावांचे लक्ष्य दिले होते. येथून आरसीबी सामना सहज हरेल असे वाटत होते. पण बेंगळुरूच्या गोलंदाजांनी आपली ताकद दाखवत सामना आरसीबीकडे झुकवला. त्यामुळे आता बेंगळुरू सामना जिंकू शकेल असे वाटत होते, पण अखेरीस बेंगळुरूला पराभव पत्करावा लागला. आरसीबीच्या पराभवानंतर बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने याचे कारण सांगितले आहे. फॅफने आरसीबीच्या पराभवासाठी नियमाला जबाबदार धरले आहे.

एलिमिनेटर सामना हारल्यानंतर फॅफ म्हणाला की, अनेक संघ 1ते 9 जागेवर थांबले होते, परंतु आम्ही आमचे सर्वोत्तम दिले आणि सर्वांना धक्का बसेल अशा प्रकारे पुनरागमन केले. आम्ही 8 पैकी 7 सामने गमावले होते. असे असूनही, पुनरागमन केल्याबद्दल संघ कौतुकास पात्र आहे.

फाफ पुढे म्हणाला की, जेव्हा आम्ही पाहिले की मैदानावर भरपूर दव आहे, तेव्हा आम्हाला वाटले की आम्ही 20 धावा कमी केल्या आहेत. या खेळपट्टीवर 180 धावा ही चांगली धावसंख्या ठरली असती. सुरुवातीला चेंडूही स्विंग होत होता. तथापि, नवीन इम्पॅक्ट खेळाडू नियमानुसार या धावसंख्येचा बचाव करणे कठीण होते. गेल्या सहापैकी सहा सामने जिंकून आम्ही चांगले पुनरागमन केले होते. आज आम्ही फलंदाजीत तशी खास कामगिरी दाखवली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT