Sourav Ganguly sakal
IPL

Sourav Ganguly Z+ Security: सौरव गांगुलीची सुरक्षा वाढवली! दादा आता Z+च्या घेऱ्यात, काय आहे कारण?

दादांना झेड श्रेणीची सुरक्षा देणे हे नवे राजकीय खेळी ?

Kiran Mahanavar

Sourav Ganguly Z+ Security: पश्चिम बंगाल सरकारने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी सरकार आता गांगुलीला झेड श्रेणीची सुरक्षा देणार आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांवर आठ ते दहा पोलिसांची नजर असेल. Y-श्रेणी सुरक्षा कवचाखाली गांगुलीला तीन पोलिसांचे रक्षण होते.

गांगुलीची सुरक्षा का वाढवली?

बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांना यापूर्वी 'वाय' श्रेणीची सुरक्षा होती. त्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी सरकारने गांगुलीची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. बंगाल सरकारच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “व्हीव्हीआयपी सुरक्षा संपल्यानंतर प्रोटोकॉलनुसार आढावा घेण्यात आला. त्यानंतर गांगुलीची सुरक्षा झेड श्रेणीत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दादाच्या सुरक्षेला काही धोका आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अधिकारी गांगुली यांच्या कार्यालयात पोहोचले

मंगळवारी, राज्य सचिवालयाचे प्रतिनिधी गांगुली यांच्या बेहाला कार्यालयात पोहोचले, जिथे त्यांनी कोलकाता पोलिस मुख्यालय लालबाजार आणि स्थानिक पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. "गांगुली सध्या त्याच्या टीम दिल्ली कॅपिटल्ससह प्रवास करत आहे आणि 21 मे रोजी कोलकाता येथे परत येईल. त्या दिवसापासून त्याला Z-श्रेणी सुरक्षा मिळण्यास सुरुवात होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

बंगालमध्ये कोणाला मिळते झेड प्लस सुरक्षा?

पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल सीव्ही आनंद बोस, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रीय सचिव अभिषेक बॅनर्जी यांना झेड प्लस सुरक्षा मिळते. फिरहाद हकीम आणि मोलॉय घटक या मंत्र्यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. भाजपच्या पश्चिम बंगालच्या अध्यक्षा सुकांता मजुमदार यांना सीआयएसएफ सुरक्षेसह झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

सौरव गांगुली यापूर्वी केंद्र सरकारच्या जवळ होता. दादांना आपल्या पक्षात येण्याची ऑफरही सत्ताधाऱ्यांनी दिली होती. भारताचा माजी कर्णधार मात्र यासाठी तयार नव्हता. यानंतर अचानक दोघांमध्ये खटके उडाल्याच्या बातम्याही समोर आल्याने सौरवला बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. आता बंगाल सरकारच्या वतीने दादांना झेड श्रेणीची सुरक्षा देणे हे नवे राजकीय समीकरण सूचित करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT