Gautam Gambhir Sakal
IPL

Gautam Gambhir: 'मला टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, कारण...', अखेर गंभीरने मौन सोडत स्पष्टच सांगितलं

Pranali Kodre

Team India Coach: भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ (BCCI) लवकरच भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती करणार आहे. यासाठी 27 मे पर्यंत बीसीसीआयने उमेदवारी अर्जही मागवले होते. यादरम्यान भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरचे नाव आघाडीवर आहे.

काही दिवसांपूर्वी असेही रिपोर्ट आले होते की गंभीरचे नाव या पदासाठी जवळपास पक्के झाले आहे. अशातच आता गंभीरने भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्याबाबत भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की जर त्याला ही संधी मिळाली, तर तो त्याच्यासाठी मोठा सन्मान असेल.

अबुधाबीमधील मेडेओर हॉस्पिटलमधील एका कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला, 'मला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळायला आवडेल. तुमच्या राष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देण्यापेक्षा कोणताच मोठा सन्मान नाही. तुम्ही जेव्हा भारताचे प्रतिनिधित्व करता, तेव्हा तुम्ही 140 कोटी भारतीयांचे आणि जगभरातील भारतीयांचे प्रतिनिधित्व करत असता. यापेक्षा मोठी गोष्ट कोणती?'

'भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मी नाही, तर 140 कोटी भारतीय मदत करतील. जर प्रत्येकाने आमच्यासाठी प्रार्थना केली, तर आम्ही आणखी चांगले खेळू आणि त्यांचे प्रतिनिधित्व करू, तर भारत वर्ल्ड कप जिंकेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निडरता आहे.'

सध्या भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड आहे, परंतु त्याचा कार्यकाळ जून 2024 मध्ये संपणार आहे. तसेच तो पुन्हा अर्ज करणार नसल्याचे म्हटले जात आहे. म्हणजेच सध्या चालू असलेली टी२० वर्ल्ड कप स्पर्धा द्रविडची प्रशिक्षक म्हणून अखेरची स्पर्धा असणार आहे.

गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने जिंकली आयपीएल ट्रॉफी

दरम्यान, नुकतेच गौतम गंभीर मेंटॉर असताना कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. कोलकाताचा हे विजेतेपद जिंकून देण्यात गंभीरचे मोठे योगदान राहिले.

साडेतीन वर्षांसाठी करार

बीसीसीआयने यापूर्वीच माहिती दिली आहे की नवा प्रशिक्षकाचा करार हा साडेतीन वर्षांचा असणार आहे. म्हणजेच 2027 च्या अखेरपर्यंत हा करार असेल. तसेच तिन्ही क्रिकेट प्रकारांसाठी एकच मुख्य प्रशिक्षक असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT