Gautam Gambhir switching the ball manufacturer esakal
IPL

Gautam Gambhir KKR vs RR : बॉल तयार करणारी कंपनीच बदला... पराभवानंतर केकेआरच्या मेंटॉरचे अजब वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir switching the ball manufacturer IPL 2024 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात षटकारांचा... चौकारांचा अन् धावांचा नुसता पाऊस पडत आहे. प्रत्येक सामन्यात जवळपास 400 ते 450 धावा ठरल्यासारख्या आहेत. यामुळे फलंदाज गोलंदाजांपेक्षा वरचढ ठरत असून, गोलंदाजी करताना गोलंदाज हतबल दिसत आहेत.

आयपीएलच्या 31 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात 447 धावा झाल्या. केकेआरने 223 तर राजस्थानने 224 धावा केल्या. सुनिल नारायण आणि जॉस बटलर यांनी शतके ठोकली. केकेआरने 223 धावा करून देखील सामना गमावला.

सामना गमावल्यानंतर केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीरने यंदाच्या हंगामात जो काही धावांचा महापूर आला आहे तो रोखण्यासाठी एक उपाय सुचवला. यामुळे सामन्यात बॅट अन् बॉलचं संतुलन निर्माण होण्यास मदत होईल. गौतम गंभीरनं चेंडू तयार करणारी कंपनी बदलण्याचा सल्ला दिला.

गौतम गंभीरने सामन्यानंतर 180 नॉट आऊट या पॉडकास्टमध्ये आपलं मत व्यक्त केलं. तो म्हणाला की, 'जर एखादी बॉल तयार करणारी कंपनी 50 षटके टिकेल असा चेंडू तयार करू शकत नसेल तर तुम्हाला ती कंपनी बदलण्याची गरज आहे. बॉलची कंपनी बदलण्यात काही गैर नाही. कूकाबुरा चेंडू वापरण्याची अशी काय सक्ती आहे?

ड्युक बॉल हा स्विंग अन् सीम होतो

गौतम गंभीरने ड्युक बॉल वारण्याचा सल्ला दिला आहे. ते त्यांच्या सीम होण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. यामुळे गोलंदाजांना जास्त अटॅकिंग ऑप्शन मिळतील. विशेषकरून ज्या खेळपट्ट्यांवर नैसर्गिकरित्या चेंडू स्विंग आणि बाऊन्स होत नाही तेथे हा पर्याय चांगला आहे.

हर्षा भोगलेंचे देखील ड्युकला समर्थन

गौतम गंभीरच्या या वक्तव्याला हर्षा भोगले यांनी देखील पाठिंबा दर्शवला. त्यांनी देखील आपण ड्युक चेंडू वापरला पाहिजे असं सोशल मीडियावर लिहीलं. त्यांनी सांगितलं की आता चांगला सीम होणारा आणि हवेत स्विंग होणारा चेंडू वापरण्याची गरज आहे. यामुळे बॅट आणि बॉल मधील संतुलन कायम राहील.

हर्षा भोगलेंच्या मते चेंडू बदलणं हा अनेक उपायांमधील एक उपाय झाला. टी20 क्रिकेट फॉरमॅटला अजून रंजक आणि स्पर्धात्मक करण्यासाठी अनेक उपाय करावे लागतील जेणेकरून फलंदाज आणि गोलंदाज दोघेही आपलं कसब दाखवू शकतील.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT