पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात 3 विकेट्सनी मात दिली. पंजाबने गुजरातचे 200 धावांचे आव्हान 19.5 षटकात 7 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. शशांक सिंगने 29 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. त्याला आशुतोष शर्माने 17 चेंडूत 31 धावा ठोकत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
गुजरात टायटन्सने आज पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 199 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने दमदार फलंदाजी करत 48 चेंडू नाबाद 89 धावांची खेळी केली. तर स्लॉग ओव्हरमध्ये राहुल तेवतियाने तडाखेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करत 8 चेंडूत नाबाद 23 धावा चोपल्या. यामुळे गुजरात पंजाबसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवू शकला. साई सुदर्शनने देखील 19 चेंडूत 33 धावा करत चांगला हातभार लावला.
पंजाबला 6 चेंडूत विजयासाठी 7 धावांची गरज
पहिल्याच चेंडूवर नाळकांडेने आशुतोष शर्माला बाद केलं. त्याने 17 चेंडूत 31 धावा केल्या.
दुसरा चेंडू नाळकांडेने बाऊन्सर टाकला. मात्र तो हरप्रीत ब्रारच्या डोक्यावरून गेल्याने एक वाईडची धाव मिळाली. मात्र गुजरातने रिव्ह्यू घेतला अन् तिसऱ्या अंपायरने चेंडू वैध ठरला.
चार चेंडूत 6 धावांची गरज असताना नाळकांडेने तिसऱ्या चेंडूवर एक धाव झाली.
तीन चेंडूत 5 धावा हव्या असताना त्यानंतर ब्रारने चौथ्या चेंडूवर चौकार मारत गुजरातच्या सामना 2 चेंडूत 1 धाव असा आणला.
2 चेंडूत 1 धावांची गरज असताना शशांक सिंहने एक धाव घेत सामना जिंकून दिला.
आशुतोष शर्माने अझमतुल्ला टाकत असलेल्या 18 व्या षटकात तीन चौकारांसह 16 धावा वसूल केल्या. यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. पंजाबने सामना 12 चेंडूत 25 धावा असा आणला. त्यानंतर 19 व्या षकात शशांक सिंह आणि आशुतोष शर्माने मोहित शर्माच्या षटकात 18 धावा चोपून काढत सामन्यावर पकड निर्माण केली.
शशांक सिंह एका बाजूने लढत असताना दुसऱ्या बाजूने पंजाब किंग्जच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी त्याची साथ सोडली. पंजाबची अवस्था 17 षटकात 6 बाद 159 धावा अशी झाली होती. पंजाबला विजयासाठी 18 चेंडूत 41 धावांची गरज आहे.
गुजरात टायटन्सचे 200 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरूवात खराब झाली होती. मात्र आधी प्रभसिमरन (35 धावा) त्यानंतर शशांक सिंहने डाव सावरत पंजाबला 12 षटकात 111 धावांपर्यंत पोहचवले.
शुभमन गिलने 48 चेंडूत नाबाद 89 धावांची खेळी केली. तर राहुल तेवतियाने 8 चेंडूत 23 धावा ठोकत गुजरातला 20 षटकात 3 बाद 199 धावांपर्यंत पोहचवलं. पंजाबसमोर आता विजयासाठी 200 धावांचे आव्हान आहे.
शेवटच्या तीन षटकात शुभमन गिल आणि राहुल तेवतिया यांनी तुफान फटकेबाजी करत गुजरातला 180 धावांचा टप्पा पार करून दिला. गिलने देखील 80 धावांचा टप्पा पार केला असून गुजरातने मोठ्या धावसंंख्येकडे कूच केली आहे.
साई सुदर्शनने 19 चेंडूत 33 धावा करत गुजरातची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. हर्षल पटेलने त्याला बाद केलं. दुसरीकडे शुभमन गिलने 35 चेंडूत 59 धावांची खेळी करत गुजरातला 16 षटकात 3 बाद 141 धावांपर्यंत पोहचवलं.
वृद्धीमान साहा बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि केन विलियमसन यांनी भागीदारी रचत गुजरातला 7 षटकात 57 धावांपर्यंत मजल मारून दिली.
कगिसो रबाडाने गुजरात टायटन्सला पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर वृद्धीमान साहाला 11 धावांवर बाद केलं. गुजरातनं पॉवर प्लेच्या 4 षटकात 1 बाद 35 धावा केल्या आहेत.
पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जने संघात बदल केला असून दुखापतग्रस्त लियाम लिव्हिंगस्टोन आजचा सामना खेळणार नाहीये. त्याच्या ऐवजी संघात सिकंदर रझाला स्थान मिळालं आहे.
या सामन्यात गुजरात संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र पंजाब किंग्ज गुजरातविरुद्धच्या सामन्यासाठी संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. लियाम लिव्हिंगस्टोनला ब्रेक दिला जाऊ शकतो. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब संघासाठी सॅम करन या सामन्यात गेम चेंजर ठरू शकतो.
आज गुजरात टायटन्स (GT) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळला जाणारा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. (Time for the toss)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.