GT vs SRH Score IPL 2023 : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला. गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. या विजयासह गुजरात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरात संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. याचबरोबर हैदराबादचे 11 सामन्यांत आठ गुण आहेत. यासह एडेन मार्करामचे हैदराबाद स्पर्धेतून जवळपास बाहेर झाला आहे.
45 धावांच्या स्कोअरवर सनरायझर्स हैदराबादची पाचवी विकेट पडली. सनवीर सिंग सहा चेंडूत सात धावा करून बाद झाला आहे. मोहित शर्माच्या गोलंदाजीवर साई सुदर्शनने त्याचा झेल टिपला.
त्याच षटकात 49 धावांवर अब्दुल समदच्या रूपाने हैदराबादला सहावा धक्का बसला. त्याने तीन चेंडूत चार धावा केल्या.
29 धावांच्या स्कोअरवर सनरायझर्स हैदराबादची चौथी विकेट पडली. संघाचा कर्णधार एडन मार्कराम 10 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला झेलबाद केले. या सामन्यातील शमीची ही तिसरी विकेट आहे. आता सनवीर सिंग हेनरिक क्लासेनसोबत क्रीजवर आहे. हैदराबादची धावसंख्या पाच षटकांनंतर 4 बाद 35 अशी आहे.
189 धावांचा पाठलाग करताना हैदराबाद सुरुवातीलाच बॅकफूटवर आला आहे. सनरायझर्स हैदराबादची पहिली विकेट सहा धावांच्या स्कोअरवर पडली. अनमोलप्रीत सिंग चार चेंडूत पाच धावा करून बाद झाला आहे. हैदराबादची दुसरी विकेट 11 धावांवरच पडली आणि संघाने अवघ्या 2 षटकांत दोन्ही सलामीवीर गमावले. मोहम्मद शमीने अनमोलप्रीत सिंगला राशिद खानकडून झेलबाद केले. तर यश दयालने अभिषेक शर्माला आऊट करत आपले खाते उघडले.
हैदराबादला राहुल त्रिपाठीच्या रूपाने तिसरा धक्का बसला. मोहम्मद शमीने त्याला झेलबाद केले. त्रिपाठीने दोन चेंडूत एक धाव घेतली. 12 धावांवर संघाच्या तीन विकेट पडल्या आहे.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने नऊ गडी गमावून 188 धावा केल्या. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 101 धावा केल्या. तेथे साई सुदर्शनने 47 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय गुजरातच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने पाच बळी घेतले. मार्को जॅनसेन, फजलहक फारुकी आणि टी नटराजन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
शेवटच्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने शेवटच्या षटकात चार विकेट घेतल्या. मात्र त्याची हॅटट्रिक हुकली. या षटकात भुवनेश्वरने गिल, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांना बाद केले तर नूर अहमद धावबाद झाला.
शुभमन गिलने 56 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. गिलचे आयपीएलमधील हे पहिले शतक आहे. गुजरात टायटन्ससाठी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू आहे. 19 षटकांनंतर गुजरातची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 186 अशी आहे.
शुभमन गिलने 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार मारले आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे गुजरात संघाची धावसंख्या एका विकेटवर 100 धावांच्या जवळ पोहोचली आहे. गिलचे हे पाचवे अर्धशतक आहे. आठ षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एका विकेटवर 89 अशी आहे.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने पॉवरप्लेमध्ये एक गडी गमावून 66 धावा केल्या. गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याचवेळी साई सुदर्शनही त्याला साथ देत आहे. सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर साहा बाद झाल्यानंतर या दोघांनीही शानदार भागीदारी केली. सात षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एका विकेटवर 78 अशी आहे.
प्रथम फलंदाजी करताना गुजरातची सुरुवात अत्यंत खराब झाली. या सामन्यात ऋद्धिमान साहा खातेही न उघडता बाद झाला आहे. भुवनेश्वर कुमारने त्याला झेलबाद केले. साहाने तीन चेंडूंचा सामना केला मात्र त्याला खाते उघडता आले नाही. आता साई सुदर्शन शुभमन गिलसोबत क्रीझवर आहे. दोन षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एका विकेटवर 17 धावा आहे.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार मार्करामने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.