Hardik Pandya angry on Mohammed Shami  ESAKAL
IPL

VIDEO : GT चा पहिला पराभव; शामीवर भडकला कर्णधार पांड्या

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : सनराईजर्स हैदराबादने आयपीएलच्या 21 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) आठ गडी राखून पराभव केला. हैदराबादने गुजराची विजयी घोडदौड रोखली. यापूर्वी गुजरात टायटन्सने सलग तीन सामने जिंकून हंगामाची दमदार सुरूवात केली होती. मात्र केन विल्यमसनच्या दमदार अर्धशतकी खेळी आणि निकोलस पूरनच्या आक्रमक फटकेबाजीमुळे गुजरातचे 163 धावांचे आव्हान हैदराबादने दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. दरम्यान, गुजरातचा पहिला पराभव दिसू लागल्यावर हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) सटकल्याचे दिसून आले. सध्या सोशल मीडियावर हार्दिक पांड्या मोहम्मद शामीवर (Mohammed Shami) भडकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हैदराबाद ज्यावेळी गुजरात टायटन्सच्या 163 धावांचा पाठलाग करत होती त्यावेळी 13 व्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्यास आला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवीर राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू हवेत उडाला. मोहम्मद शामीकडून हा कॅच मिस झाला. यानंतर हार्दिक पांड्या मोहम्मद शामीवर भडकला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या षटकात केन विल्यमसनने हार्दिक पांड्याला सलग दोन षटकार मारले. त्यामुळे हार्दिक पांड्या जास्तच नाराज झाला होता. त्यातच षटकाचा शेवटचा चेंडू त्रिपाठीने हवेत मारला मात्र मोहम्मद शामीने हा हाफ चान्स घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे चेंडू शमीच्या पुढे टप्पा खाऊन हातात आला.

यानंतर हार्दिक पांड्या शामीवर भडकला. मात्र शामीने पांड्याच्या रिअॅक्शनवर फारसे लक्ष दिले नाही. मात्र ही बाब क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यातून सुटली नाही. त्यांनी मोहम्मद शामी सारख्या वरिष्ठ खेळाडूसोबत असे वर्तन करणाऱ्या हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात केली.

गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 162 धावा केल्या होत्या. त्यात कर्णधार हार्दिक पांड्याच्या नाबाद अर्धशतकाचा मोठा वाटा होता. यानंतर हैदराबादने गुजरातचे हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. गुजरातचा हा हंगामातील पहिलाच पराभव आहे. तर हैदराबादने आला दुसरा विजय साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT