Hardik Pandya News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे, अशात संघांची या हंगामासाठी तयारी सुरु झाली आहे. गुजरात टायटन्सचा संघ या हंगामात नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.
त्यामुळे यंदा गिल आणि आशिष नेहरा ही कर्णधार-प्रशिक्षकाची जोडी गुजरात संघात पाहायला मिळणार आहे. नेहरा गुजरातचा 2022 पासून मुख्य प्रशिक्षक आहे.
यापूर्वी गुजरातने खेळलेल्या 2022 आणि 2023 आयपीएल हंगामात अष्टपैलू हार्दिक पंड्या कर्णधार होता. त्याच्या आणि नेहराच्या जोडीने या दोन्ही हंगामात संघाला मोठे यश मिळवून दिले होते. 2022 मध्ये गुजरातने आयपीएलचे विजेतेपजही जिंकले, तर 2023 मध्ये गुजरात उपविजेता राहिले होते.
मात्र 2024 आयपीएल लिलावानंतर मोठा खळबळजनक निर्णय चाहत्यांना पाहायला मिळाला. हार्दिकला त्याची आधीची फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने गुजरातकडून ट्रेडिंग मार्फत संघात परत घेतले आणि त्याच्याकडे कर्णधारपदही सोपवले.
हा आयपीएलच्या इतिहासातील मोठ्या निर्णयांपैकी एक मानला जात आहे. दरम्यान, याबद्दल आशिष नेहराने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
नेहरा पत्रकारांशी बोलताना म्हणाला, 'कोणत्याही खेळात पुढे जाणे महत्त्वाचे असते. अनुभव तुम्ही विकट घेऊ शकत नाही. हार्दिक पंड्या किंवा मोहम्मद शमीसारख्या खेळाडूंची कमी भरून काढणे सोपे नाही. पण अशा गोष्टी शिकवणाऱ्या असतात आणि संघ असाच पुढे जात असतो.'
दरम्यान, नेहराला असेही विचारण्यात आले की त्याने पंड्याला थांबवण्याचा प्रयत्न केला का?
त्यावर नेहराने सांगितले, 'मी पांड्याला संघात राहण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्ही जेवढे जास्त खेळता, तेवढा तुम्हाला अनुभव मिळतो. तो जर दुसऱ्या कोणत्याही संघात गेला असता, तर कदाचीत मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता. तो इथे (गुजरात टायटन्स) दोन वर्षे खेळला, पण तो अशा संघात गेला, जिथे (मुंबई इंडियन्स) तो आधी 5-6 वर्षे खेळला आहे.'
याशिवाय ज्याप्रकारे अचानक पांड्याचे ट्रेडिंग झाले, त्यावरून नेहराने इतर फ्रँचायजींसाठी इशारावजा अंदाजही व्यक्त केला आहे. तो म्हणाला की आयपीएल युरोपियन क्लब फुटबॉलच्या मार्गावर जात आहे.
तसेच त्याने हार्दिकला शुभेच्छा देत आशा व्यक्त केली की त्याच्या समोर नवीन आव्हाने असल्याने तो त्यातून शिकेल.
दरम्यान, गुजरातला पांड्या संघातून गेल्यानंतर मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त असल्याने मोठा धक्का बसला आहे. त्यातच प्रमुख फिरकीपटू राशीद खानही पाठीच्या दुखापतीतून परत येत आहे. त्यामुळे गुजरात समोर काही आव्हाने असणार आहेत. परंतु, नेहराने विश्वास व्यक्त केला आहे. संघातील इतर खेळाडूही जबाबदारी घेण्यास सक्षम आहेत.
गुजरातला आयपीएल 2024 मधील पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध २४ एप्रिलला खेळायचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.