भारतीय क्रिकेट वर्तुळात अष्टपैलू बंधूची जोडी म्हणून हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांची जोडी ओळखली जाते. ही जोडी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळून मोठी झाली. मात्र आता ही पांड्या बंधूंची जोडी यंदाच्या मेगा आयपीएल लिलावात (IPL Mega Auction 2022) फुटली. मुंबई इंडियन्सने या दोघांनाही रिटेन केले नाही. हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सच्या तंबूत शिरला. तो फक्त शिरला नाही तर त्याने कळपाचे सरदार पदही पदरात पाडून घेतले. त्यामुळे आता तो आपल्या भावाला म्हणजे कृणाल पांड्याला देखील आपल्या कळपात सामिल करून घेणार असे वाटत होते. मात्र लखनौ सुपरजायंटने पांड्या बंधूंची जोडी फोडली. (Hardik Pandya Krunal Pandya splits in IPL 2022 Auction)
लखनौ सुपरजायंटने (Lucknow Super Giants) डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूला 8.25 कोटी रूपये खर्चून आपल्या संघात घेतले. मात्र लखनौ सुपरजायंटने पांड्याला आपल्या गोटात खेचल्या खेचल्या गुजरात टायटन्सची (Gujarat Titans) कळ देखील काढली. यामुळे या दोन्ही संघातील ट्विटर वॉरची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता ही दुष्मनी कुठंपर्यंत जाते हे पहावे लागले.
लखनौ सुपरजायंट आणि गुजरात टायटन्स या दोन नव्या संघात पांड्या बंधूंमुळे जुंपली. या ट्विटर वॉरची सुरूवात लखनौ सुपरजायंटने केली. त्यांनी 'बडे मियाँ सुभानअल्ला. काय गुजरात टायटन्स बरोबर बोललो ना?' असे ट्विट करत गुजरात टायटन्सला डिवचले.
गुजरात टाययन्सने देखील लखनौ सुपरजायंटच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. 'गाण्याचे बोल चुकले आहेत पण, तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. आता होणार दंगल' असे प्रत्युत्तर गुजरात टायटन्सने दिले.
दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि कृणाल पांड्याला या दोघांच्यातला वाद 2020 मध्ये चव्हाट्यावर आला होता. दीपक हुड्डा कृणाल पांड्या कर्णधार असलेल्या बडोदा संघातून बाहेर देखील पडला होता. विशेष म्हणजे लखनौ सुपरजायंटने या दोघांनाही आपल्या संघात घेतले आहे. दोघेही फिरकी अष्टपैलू खेळाडू आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.