Irfan Pathan on Hardik Pandya : जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ज कपसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. वृत्तानुसार भारतीय कर्णधार रोहित शर्माही निवडकर्त्यांसोबत दिल्लीत बसणार आहे. पण, हे होण्याआधीच इरफान पठाणने मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. आणि हार्दिक पांड्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याची चिंता हार्दिक पांड्याच्या सध्याच्या फॉर्मबद्दल आहे.
भारताचा महान अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने त्याच्या एक्स-हँडलवर हार्दिक पांड्याबद्दल एक पोस्ट केली. तो म्हणाला की, हार्दिक पांड्याच्या फलंदाजीत पॉवर कमी होतीय. जेव्हा हार्दिक वानखेडेवर खेळतो तेव्हा तो वेगळा असतो. पण, ज्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना पाठिंबा मिळतो, तिथे हार्दिक संघर्ष करताना दिसतो, ही चिंतेची बाब आहे.
हार्दिक पांड्याने आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळल्या गेलेल्या पहिल्या 8 सामन्यांमध्ये केवळ 151 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 39 धावा आहे. म्हणजे एकही पन्नास प्लस स्कोअर नाही.
आठ सामन्यात पांड्याच्या बॅटमधून फक्त 7 षटकार दिसले आहेत. यातील सर्वाधिक षटकार त्याने वानखेडेवरच मारले आहेत. पंड्याचा या हंगामात आतापर्यंतचा फलंदाजीचा स्ट्राइक रेट 142.45 आहे.
जर आपण पांड्याच्या गोलंदाजीबद्दल बोललो, तर त्याने आयपीएल 2024 च्या पहिल्या 8 सामन्यांमध्ये केवळ 4 विकेट घेतल्या आहेत, तेही 46.50 च्या महागड्या सरासरीने आणि 10.94 च्या उच्च इकॉनॉमी रेटने.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.