नवी दिल्ली : येत्या ६ फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी २० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) स्थान मिळालेले नाही. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीबाबत (Hardik Pandya Bowling Update) निवडसमितीला कोणतीच माहिती नाही असे बोलले जाते. या बाबत निवडसमिती आणि त्याच्यात संवादाचा अभाव असल्याची टीकाही होते. मात्र हार्दिक पांड्याने याबाबत खुलासा करत सर्वांना माझ्या गोलंदाजीच्या फिटनेसबाबत सर्वांना माहिती आहे असे म्हणते हा मुद्दा खोडून काढला. तो आयपीएल (IPL) फ्रेंचायजी अहमदाबादने आयोजित केलेल्या मुलाखतीदरम्यान पाटीआयशी बोलत होता. (Hardik Pandya Statement About His Bowling says it will be a surprise for everyone)
निवडसमितीने (Selection Committee) तो गोलंदाजी करू शकत नसल्याने त्याला संघात घेतलेले नाही. याबाबत हार्दिक पांड्याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, निवडसमितीने वेस्ट इंडीज (West Indies) आणि श्रीलंकेविरूद्धच्या (Sri Lanka) मालिकेसाठी माझा विचार न करणे मी समजू शकतो. मी अजूनही माझ्या गोलंदाजीवर काम करण्याचा प्रयत्न करत आहे.
हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, 'फलंदाजी आणि गोलंदाजी करणारा हार्दिक पांड्या ऐकायला बरे वाटते. मात्र पांड्या फक्त फलंदाज म्हणून ऐकायला चांगले वाटत नाही.' हार्दिकने मान्य केले की त्याने निव्वळ फलंदाज होण्यापूर्वी खूप विचार केला होता.
गोलंदाजीबाबत Hardik Pandya Bowling Status) सध्या त्याची स्थिती काय आहे असे हार्दिक पांड्याला विचारण्यात आल्यावर त्याने ते गुलदस्त्यात ठेवले. तो म्हणाला की 'ते सर्वांसाठी एक सरप्राईज असेल.' जरी पांड्याने आपले गोलंदाजीबद्दलचे पत्ते ओपन केले नसले तरी तो मान्य करतो की, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी न करू शकणे हे आव्हानात्मक आहे. टी २० वर्ल्डकप (T20 World Cup) नंतर त्याच्यावर झालेल्या टीकेचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही असेही तो म्हणाला.
त्याने सांगितले की, 'गोलंदाजी करू न शकणे हे आव्हानात्मक आहे. मी खेळाच्या तीनही क्षेत्रात माझे योगदान दिले आहे. पण, ज्यावेळी मी फक्त फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी विकेटवर काही वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र हे आव्हानात्मक होते.'
टीकेबद्दल हार्दिक पांड्या (Criticism On Hardik Pandya) म्हणतो की, 'योग्य टीका कायम चांगलची असते. मात्र टीकेचा माझ्यावर परिणाम होत नाही. मला माहिती आहे की मी काय करतोय. मला माहिती आहे की मला किती कष्ट करावे लागतात. मी पद्धतीवर जास्त मेहनत घेतो परिणामांवर नाही. ज्यावेळी तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करता त्यावेळी त्याचे परिणाम चांगलेच होतात.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.