IPL 2023 Hardik Pandya Statement : गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाने मंगळवारी आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सलग दुसरा विजय मिळवला. गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेट व 11 चेंडू राखून मात केली. दिल्ली कॅपिटल्सच्या यंदाची विजयाची प्रतीक्षा दुसऱ्या लढतीनंतरही कायम राहिली.
मोहम्मद शमी, राशीद खान, अल्जारी जोसेफ यांची प्रभावी गोलंदाजी आणि साई सुदर्शन, विजय शंकर व डेव्हिड मिलर यांची शानदार फलंदाजी गुजरात टायटन्सच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. (Latest Marathi News)
हार्दिक पांड्याच्या म्हणण्यानुसार, 21 वर्षांचा एक घातक फलंदाज लवकरच टीम इंडियासाठी खेळणार आहे. गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शन पुढील दोन वर्षांत फ्रँचायझी क्रिकेटसह भारतीय संघासाठी 'उत्कृष्ट' कामगिरी करेल, असा विश्वास हार्दिक पांड्याला आहे. (Latest Sport News)
हार्दिक पांड्या टी-20 फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत तो लवकरच साई सुदर्शनला भारताच्या टी-20 संघात परत मिळवून देऊ शकतो.
साई सुदर्शनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 48 चेंडूत 62 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यामुळे गतविजेत्या गुजरातला सलग दुसरा विजय नोंदवण्यात मदत झाली.
कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला, ' साई सुदर्शन शानदार फलंदाजी करत आहे. याचे श्रेय त्याच्यासह संघातील सहयोगी सदस्यांनाही जाते. गेल्या १५ दिवसांत त्याने बरीच फलंदाजी (सराव) केली आहे. त्याच्या मेहनतीचे हे फळ आहे.
कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला, दोन वर्षांत तो फ्रँचायझी क्रिकेट आणि अखेरीस भारतासाठी काहीतरी चांगले करेल. साहाच्या विकेट गेल्या, पण सुदर्शनने हुशारीने एक टोक राखले आणि संघाला विजय मिळवून दिला. पॉवरप्लेमध्ये आम्ही 15-20 धावा अधिक दिल्या, पण आमचे गोलंदाज चांगले परतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.