IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी झाल्याला 30व्या सामन्यात KKR ने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजी देण्यात आले. त्यानंतर जे काही मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर वादळ आलं, ते शेवटच्या षटकापर्यंत शांत झाले नाही. जोस बटलरने राजस्थान गोलंदाजाना उद्ध्वस्त करून टाकले. स्टेडियमच्या आत वादळ आले जे ओव्हर बाय ओव्हर अधिक भयानक होत गेले. सामन्यात गोलंदाजाची धूलाई पाहणारे लोक हतबल झाले. त्यामध्ये दिग्गज समालोचक हर्षा भोगले सुद्धा सामील होती.(Jos Buttler IPL 2022)
हर्षा भोगले यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये लिहिले आहे की, मला वाटले की आज क्रिकेटमधून सुट्टी काढावी पण लक्षात आले बटलरला बटलरने आज एक शो ठेवला आहे. मग पुन्हा सामना पाहिला आलो. खरं तर एका फलंदाजाच्या स्तुतीसाठी ही एक उत्तम टिप्पणी आहे.
हर्षाच्या ट्विटनंतर बटलरने आपल्या कमेंटचे मूल्य राखत शतक झळकावले जे क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहील असे होते. बटलरने आयपीएलचे दुसरे शतक ५८ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह पूर्ण केले. बटलर 61 चेंडूत 103 धावा करून बाद झाला. बटलरचे या हंगामातील हे दुसरे शतक आहे. तर या कालावधीत त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहे. बटलरच्या फलंदाजीवरून त्याचा फॉर्म किती जबरदस्त आहे. यामधून राजस्थानच्या मोहिमेत किती महत्त्वाचा ठरत आहे हे दिसून येते.
राजस्थानच्या जोस बटलरने या दुसऱ्या शतकासह चालू असलेल्या आयपीएल हंगामातीलमधील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केएल राहुलसह उर्वरित फलंदाजांवर मोठी आघाडी घेतली आहे. सहा सामन्यांमधील समान खेळीनंतर, बटलरने आतापर्यंत 75.00 च्या सरासरीने आणि दोन शतके आणि अर्धशतकांसह 375 धावा केल्या आहे. त्याच्यानंतर केएल राहुल (235) दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या ऑरेंज कॅप बटलरच्या ताब्यात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.