Rinku Singh 
IPL

Rinku Singh: उधारीच्या बॅटवर मारले होते षटकार; रिंकू सिंहच्या पाच सिक्सरची Inside Story

रिंकू सिंगच्या पाच सिक्सरची इनसाईड स्टोरी

धनश्री ओतारी

गुजरात टायटन्सने विजयासाठी ठेवलेल्या 205 धावांचा पाठलाग करताना केकेआरने झुंजार खेळ करत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. केकेआरचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंहने शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज होती त्यावेळी सलग पाच षटकार मारत सामना जिंकून दिला. त्याच्या या खेळीचे क्रिकेट जगतात तोंडभरुन कौतुक होत आहे. अशातच रिंकू सिंगच्या पाच सिक्सरची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. (Hero of kolkata knight riders rinku singh used nitish rana bat 5 sixes in last over Inside Story)

रिंकू सिंगने ज्या बॅटने शेवटच्या षटकात 5 षटकार मारून आपले नाव कोरले ती बॅट दुसऱ्या कोणाची नसून कर्णधार नितीश राणाची होती. सामना संपल्यानंतर खुद्द नितीश राणाने खुलासा केला आहे. त्याचा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रिंकूने त्याच्याकडे ही बॅट मागितली होती. जी बॅट नितीश राणाला द्यायची नव्हती. पण आतून कोणीतरी त्याच्यासाठी ही बॅट आणली. नितीशने खुलासा केला की, आपण या बॅटने शेवटचे 2 सामने आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळलो आहे.

या बॅटची उचल खूप चांगली आहे आणि ती हलकीही आहे असं सांगत आता ती बॅट माझी राहिली नाही रिंकूची आहे. असही नितीश राणा म्हणाला.

गुजरात टायटन्सने केकेआरला विजयासाठी 205 धावांच टार्गेट दिलं होतं. प्रत्युत्तरात केकेआरने 19 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 176 धावा केल्या होत्या. लास्ट ओव्हरमध्ये त्यांना विजयासाठी 29 धावांची आवश्यकता होती.

गुजरात टायटन्सचा यश दयाल लास्ट ओव्हर टाकत होता. पहिल्या बॉलवर सिंगल काढून उमेश यादवने रिंकू सिंहला स्ट्राइक दिली. त्यानंतर रिंकूने जे केलं, ते अद्भूत होतं. अशा चमत्काराची कोणीही अपेक्षा केली नव्हती. रिंकूने यशच्या 5 चेंडूंवर 5 सिक्स मारले.

विचार नको करु, मार रिंकू

या ऐतिहासिक कामगिरीनंतर अवॉर्ड प्रेजेंटेशनच्यावेळी रिंकूने उमेश यादवचे ते शब्द आठवले. उमेश यादव रिंकूला एवढच म्हणाला, ‘विचार नको करु, मार रिंकू’. त्यानंतर रिंकूने यश दयालच्या बॉलिंगवर एकापाठोपाठ एक पाच सिक्स मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT