how rcb csk qualify for playoff know equation ipl 2024 sakal
IPL

IPL 2024 : 18 धावा, 11 चेंडू... CSK vs RCB दोन्ही संघ कसे ठरतील प्लेऑफसाठी पात्र? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IPL 2024 RCB vs CSK : आयपीएलचा यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. बहुतांश संघांचे 13 सामने पूर्ण झाले आहेत. फक्त सनरायझर्स हैदराबादचे दोन सामने बाकी आहेत. जो प्लेऑफच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Kiran Mahanavar

IPL 2024 RCB vs CSK : आयपीएलचा यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. बहुतांश संघांचे 13 सामने पूर्ण झाले आहेत. फक्त सनरायझर्स हैदराबादचे दोन सामने बाकी आहेत. जो प्लेऑफच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील 18 मे रोजी बेंगळुरू येथे होणारा सामनाही निर्णायक ठरू शकतो. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. अशा परिस्थितीत, कोणता संघ कोणत्या समीकरणासह पात्र ठरू शकतो हे जाणून घेऊया....

आधी चेन्नई सुपर किंग्जबद्दल बोलूया.... 13 पैकी 7 सामने जिंकून सीएसके गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. सीएसकेचे 14 गुण आहेत आणि नेट रन रेट +0.528 आहे. सीएसकेला प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असेल तर त्यांना आरसीबीविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. किंवा हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल आणि सीएसके 15 गुणांसह पात्र ठरू शकेल.

यासह, सीएसकेसाठी दुसरे समीकरण म्हणजे त्यांचा पराभव झाला तर तो18 पेक्षा कमी धावांनी किंवा 11 पेक्षा कमी चेंडू शिल्लक असताना झाला तर ठिक आहे. त्यामुळे त्यांचा नेट रन रेट चांगला राहिली. यासह, सीएसकेच्या बाजूने तिसरे समीकरण म्हणजे सनरायझर्स हैदराबादने त्यांचे दोन्ही सामने गमावले. तर सीएसके पात्र ठरू शकते कारण त्यांचा नेट रन रेट चांगला आहे.

आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोरबद्दल बोलूया.... 13 पैकी 6 सामने जिंकून आरसीबी सध्या सहाव्या स्थानावर आहे. त्याचे 12 गुण आहेत आणि नेट रन रेट +0.387 आहे. जर आरसीबीला प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असेल तर त्यांना सीएसकेचा 18 पेक्षा जास्त धावांनी किंवा 11 पेक्षा जास्त चेंडू शिल्लक असताना पराभव करावा लागेल.

यासह, दुसरे समीकरण असे आहे की जर त्यांनी सीएसकेविरुद्ध थोड्या फरकाने सामना जिंकला. तर त्यांना सनरायझर्स हैदराबादच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागले. आणि याचा फायदा सीएसके आणि आरसीबी या दोघांना होईल आणि ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतील.

मात्र, सनरायझर्सला दोन्ही सामने हरणे कठीण दिसत आहे. त्याचे उर्वरित दोन सामने गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जविरुद्ध आहेत. प्लेऑफमधील उर्वरित दोन संघ कोणते हे पाहणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

Mohol News : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पोलीसात तक्रार दाखल, दोघेजण ताब्यात

Kalyna Rural Assembly Election : तोतया पोलिसांची ग्रामीण मध्ये दहशत! कल्याण ग्रामीण मधील मनसेची शाखा बंद केली

Manipur Government : मणिपूरचे राज्य सरकार अल्पमतात? ‘एनपीपी’ने पाठिंबा काढून घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाचा दावा

SCROLL FOR NEXT