Team India | T20 World Cup 2024 Sakal
IPL

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

T20 World Cup 2024 Live Streaming: जूनमध्ये होणारा टी20 वर्ल्ड कप भारतात मोफत पाहाता येणार आहेत, पण कोणासाठी ही ऑफर आहे, जाणून घ्या.

Pranali Kodre

T20 World Cup 2024 Live Streaming: जून 2024 मध्ये टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे होणार असून 1 ते 29 दरम्यान या स्पर्धेतील सामने होतील.

दरम्यान, आता या स्पर्धेला सुरु होण्यासाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेला असताना स्पर्धेचे अधिकृत प्रसारक डिज्नी प्लस हॉटस्टारने मोठी घोषणा केली आहे.

डिज्नी प्लस हॉटस्टारने घोषित केले आहे की भारतातील स्मार्ट फोन युजर्सला आगामी टी20 वर्ल्ड कप त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत पाहाता येणार आहे.

यापूर्वीही डिज्नी प्लस हॉटस्टारने अशी ऑफर वनडे वर्ल्ड कप आणि आशिया कपवेळी दिली होती. त्यामुळे त्यांना विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळाली होती. आता त्यांनी आगामी टी20 वर्ल्ड कपसाठीही हेच मॉडेल कायम केले आहे.

दरम्यान, जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमधील सामने अमेरिकेतील तीन ठिकाणी आणि वेस्ट इंडिजमधील सहा ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तसेच हा वर्ल्ड कप खास आहे, कारण यंदाच्या या जागतिक स्पर्धेत तब्बल 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांचे पहिल्या फेरीसाठी 4 गटात विभागणी करण्यात आली आहे.

या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका, वेस्ट इंडिज, ओमान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , बांगलादेश आणि नेदरलँड्स हे 20 संघ सहभागी होणार आहेत.

भारतीय संघाचा समावेश अ गटात असून या गटात पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका हे संघ आहेत. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होईल, तर 9 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे.

तिसरा सामना अमेरिकेविरुद्ध 12 जूनला होईल, तर चौथा सामना 15 जूनला कॅनडाविरुद्ध होईल. पहिल्या फेरीतील हे चारही सामने भारतीय संघ अमेरिकेत खेळणार आहे.

  • टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  • राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT