IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगमध्ये तळाचे दोन संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) आतापर्यंतचा हंगाम इतक काही चांगला गेला नाही. सीएसकेला आतापर्यंत दोनच विजय मिळवता आले आहे, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने सात सामने गमावले आहे. आयपीएलमध्ये संघांनी आपापल्या बाजूने नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी दिली आहे. असं असताना ही भारताच्या अंडर 19 विश्वचषकातील स्टार राजवर्धन हंगरगेकरचा(Rajvardhan Hangargekar) एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे CSK वर कोठे तरी चाहते नाराज होताना दिसत आहे.(Rajvardhan Hangargekar Photo Viral)
CSK ने आयपीएल (IPL) 2022 मेगा लिलावात वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर मोठ्या बोली लावून 1.50 कोटीला संघात सामील करून घेतला. 2022 च्या हंगामात त्याच्याकडून मोठी भूमिका अपेक्षित होती. प्रिमियम वेगवान गोलंदाज दीपक चहरची दुखापत आणि सीएसकेचा खराब फॉर्म असूनही गोलंदाजाला खेळासाठी वेळ मिळाला नाही. गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई विरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये CSK चा झेंडा फडकवताना आणि फ्रॅंचायझीचा आनंद घेण्यासाठी शिट्ट्या वाजवताना दिसला.
सीएसके आता या प्रतिभावान राजवर्धनला भविष्यातील सामन्यांमध्ये पदार्पण कॅप देण्याचा विचार करेल का? हे पाहणे बाकी आहे. फक्त हंगरगेकरच नाही तर दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेल्या कर्णधार यश धुल सारखे इतर अंडर 19 विश्वचषक खेळाडू देखील अद्याप एकही सामना खेळू शकलेले नाही. दरम्यान, पंजाब किंग्जकडून संधी मिळालेल्या राज बावाला दोन सामने खेळल्यानंतर वगळण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.