India vs Australia WTC Final 2023 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून ते 11 जून दरम्यान लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या जाणार आहे. फायनलला जवळपास 20 दिवस बाकी आहेत पण खेळपट्टी तयार नाही. त्याचा फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. गेल्या वर्षी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल झाली होती, त्यात भारताची निराशा झाली होती. आयपीएलनंतर लवकरच भारतीय खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहे, जिथे ऑस्ट्रेलियन संघ आधीच गेला आहे. 7 जूनपासून अंतिम सामना खेळला जाणार आहे. अजून 20 दिवस बाकी आहेत, पण खेळपट्टीचे जे फोटो आले आहेत त्यावरून असे दिसून येते की खेळपट्टीचे काम सुरू झालेच नाही.
WTC फायनल सामना ओव्हल येथे खेळला जाईल. मायकेल जेकब्स नावाच्या युजरने आज मैदानाचा ताजा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. खेळपट्टी आणि त्याभोवतीची दोरी फोटोमध्ये दिसत आहे. खेळपट्टी आणि मैदानावर भरपूर गवत असल्याचे दिसून येत आहे. कदाचित फायनलसाठी खेळपट्टीची तयारीही अजून सुरू झालेली नाही. येत्या काही दिवसांत त्याची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट
ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलेंड, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मिशेल मार्श, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.