team india T20 World Cup 2024 sakal
IPL

T20 World Cup 2024 : ICCची मोठी घोषणा! टीम इंडिया 'या' नव्या मैदानावर खेळणार सराव सामना

Team India T20 World Cup 2024 : आसीसीने नुकतेच टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.

Kiran Mahanavar

India vs Bangladesh T20 World Cup 2024 Warm-Up Match: आसीसीने नुकतेच टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. 27 मे ते 1 जून या कालावधीत अमेरिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे वर्ल्ड कपचे सराव सामने खेळवले जाणार आहेत.

वर्ल्ड कपपूर्वी एकूण 16 सराव सामने होणार आहेत. ज्यामध्ये टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात शेवटचा सराव सामना होणार आहे. हा सामना १ जून रोजी होणार आहे. मात्र या सामन्याचे ठिकाण यापूर्वी जाहीर करण्यात आले नव्हते. अशा परिस्थितीत आता हा सामना कुठे खेळवला जाईल हे आसीसीने सांगितले आहे.

टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या मुख्य स्पर्धेपूर्वी फक्त एक सराव सामना खेळणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाचा हा पहिलाच सामना असेल. नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम स्पर्धेसाठी सज्ज आहे.

या स्टेडियमचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. आता हे स्टेडियम पहिला सामना आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 पासून खेळवला जाईल. या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना रंगणार आहे. या स्टेडियमची क्षमता 34,000 प्रेक्षकांची आहे.

16 सराव सामन्यांदरम्यान चाहत्यांना फक्त 2 सामन्यांमध्ये प्रवेश मिळेल. चांगली गोष्ट म्हणजे नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना चाहत्यांसाठी खुला असेल.

त्याचवेळी वेस्ट इंडिजमधील एक सामना चाहत्यांसाठी खुला असेल. याशिवाय चाहते सर्व सराव सामन्यांना उपस्थित राहू शकणार नाहीत. 23 मे पासून चाहत्यांना भारत-बांगलादेश सामन्याची तिकिटे खरेदी करता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News: विनोद तावडेंना अडचणीत आणणाऱ्या हितेंद्र ठाकूरांचा उमेदवार भाजपने पळवला, मतदानाच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणील ब्रेक; सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Updates : डहाणूत बहुजन विकास आघाडीला धक्का; बविआच्या उमेदवाराचा भाजप प्रवेश

आर्या-निक्कीमध्ये पुन्हा राडा ! निक्कीने आर्याला 'मोठा हाथी' म्हणत केली टीका तर आर्या म्हणाली...

Vinod Tawde : 'आप्पा ठाकूर आणि क्षितिज मला ओळखतात पण...' विनोद तावडेंनी CCTV फुटेजची मागणी, विवांता हॉटेलमध्ये काय घडलं ?

SCROLL FOR NEXT