IPL 1000th Match MI vs RR : मुंबई इंडियन्सच्या टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीन यांनी आपल्या कर्णधाराला एकदम ढासू बर्थडे गिफ्ट दिले. मुंबईने राजस्थानचे 213 धावांचे आव्हान 6 फलंदाज आणि 3 चेंडू राखून पार केले. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 17 धावांची गरज होती. त्यावेळी टीम डेव्हिडने जेसन होल्डरला सलग तीन षटकार मारत विजयश्री खेचून आणला.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर विजयासाठी 213 धावांचा मोठे आव्हान ठेवले. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवाल मुंबईच्या गोलंदाजांना एकटा भिडला. त्याने 62 चेंडूत तडाखेबाज 124 धावा ठोकल्या. यशस्वीचे हे आयपीएलमधील पहिलेच शतक आहे. यात त्याने 16 चौकार आणि 8 षटकार लगावले. राजस्थानकडून जैसवालनंतर जॉस बटलरने सर्वाधिक 18 धावा केल्या. मुंबईकडून अर्शद खानने 3 विकेट्स घेतल्या.
एका बाजूने राजस्थानचे रथी महारथी स्वस्तात माघारी जात असताना सलामीवीर यशस्वी जैसवाल मुंबईच्या गोलंदाजांना एकटा भिडला. त्याने 53 चेंडूत शतक ठोकत राजस्थानला 200 च्या जवळ पोहचवले.
राजस्थानने दमदार सुरूवात केल्यानंतर बटलर बाद झाला. त्यानंतर आपल्या इनिंगची सुरूवातच षटकाराने करणारा संजू सॅमसन देखील 10 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. त्याला अर्शद खानने बाद केले. यानंतर पियुष चावलाने देवदत्त पडिक्कलला 2 धावांवर बाद करत राजस्थानची अवस्था 3 बाद 103 अशी केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याऱ्या राजस्थानने पॉवर प्लेमध्ये 65 धावा चोपून दमदार सुरूवात केली. यात सलामीवीर यशस्वी जैसवालच्या 23 चेंडूत केलेल्या नाबाद 41 धावांचा मोठा वाटा होता. दरम्यान, सावध सुरूवात करणाऱ्या जॉस बटलरने पॉवर प्ले नंतर गिअर बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र पियुष चावलाने त्याला 18 धावांवर बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला.
मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दोन बदल केले आहे. बेहरनडॉर्फ आणि अर्जुन तेंडुलकरच्या जागी जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान यांचा समावेश करण्यात आला आहे.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.