Dinesh-Karthik-Batting 
IPL

Video: दिनेश कार्तिकला सूर गवसला; चौकार-षटकाराची आतषबाजी

विराज भागवत

कार्तिकच्या फटकेबाजीमुळे कोलकाताने मारली १७०पार मजल

IPL 2021 CSK vs KKR: चेन्नईविरूद्धच्या सामन्यात कोलकाता संघाने २० षटकांत ६ बाद १७१ धावा केल्या. टॉस जिंकून कोलकाताचा कर्णधार मॉर्गनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण तो निर्णय सलामीवीरांनी चुकीचा ठरवला. कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर दोघे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर इतर फलंदाजांनीही निराशा केली. पण अनुभवी दिनेश कार्तिकने मात्र संघाला १७०पार पोहोचवले.

१७व्या षटकात कोलकाताची अवस्था ५ बाद १२५ होती. त्यानंतर नितीश राणा आणि दिनेश कार्तिक या जोडीने दमदार फटकेबाजीला सुरूवात केली. दिनेश कार्तिकने आपला अनुभव पणाला लावला आणि योग्य ठिकाणी फटके मारत चौकार-षटकाराची आतषबाजी केली. दिनेश कार्तिकने केवळ ११ चेंडू खेळले पण त्यात त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावत सामन्यात रंगत आणली. सॅम करनच्या गोलंदाजीवर त्याने धुलाई केली. त्यामुळे कोलकाताला मोठी धावसंख्या उभारता आली.

पाहा दिनेश कार्तिकच्या फलंदाजीची एक झलक-

दरम्यान, KKRचे सलामीवीर शुबमन गिल (९) आणि व्यंकटेश अय्यर (१८) झटपट बाद झाले. पाठोपाठ कर्णधार मॉर्गनही (८) बाद झाला. राहुल त्रिपाठीने ४५ धावांची झुंजार खेळी केली. पण आंद्रे रसलने निराशा केली. अखेर नितिश राणाने २७ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. तर, दिनेश कार्तिकने त्याला साथ देत २६ धावा केल्या आणि संघाला १७१ धावांपर्यंत मजल मारू दिली. CSKकडून हेजलवूड आणि शार्दूलने २-२ तर रविंद्र जाडेजाने १ गडी बाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT