IPL 2021; CSK vs KKR : अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर चेन्नई (Chennai Super Kings) विरुद्धच्या सामन्यात कोलकाता (Kolkata Knight Riders) संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गनने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने संघाच्या डावाला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर शुभमन गिलने (Shubman Gill) एकेरी धाव घेत संघाचे आणि आपले खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर व्यंकटेशनं पुन्हा एक धाव घेत शुभमनला स्टाइक दिले.
दीपक चाहरच्या या षटकात शुभमन गिलने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर खणखणीत चौकार मारून धमाका करण्याचे संकेत दिले. पण पाचव्या चेंडूवर शुभमन गिल गडबडला. दीपक चाहरने पायचितचे अपिल केल्यानंतर मैदानातील पंचांनी त्याला बाद दिले. पण रिव्ह्यू घेत त्याने स्वत:ची विकेट वाचवली. हा क्षण फार काळ टिकला नाही. अखेरच्या चेंडूवर गडबडीने धाव घेऊन पुन्हा स्टाइकवर येण्याचा शुभमन गिलचा प्रयत्न त्याच्या चांगलाच अंगलट आला.
दीपक चाहरच्या पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू शुभमन गिलने मिड विकेटच्या दिशेने टोलावला. चेंडू सरळ रायडूच्या दिशेनं जात असताना देखील शुभमन गिलने धाव घेण्यासाठी क्रीज सोडले. नॉन स्ट्राइकवर असलेला व्यंकटेश त्याला नो..नो.. म्हणत होता. त्यावेळी शुभमन गिल खूप पुढे आला होता. तो मागे परतला खरा..पण आपली विकेट वाचवण्यात तो अपयशी ठरला. अंबातीरायडून (Ambati Rayudu) थेट स्टम्पचा वेध घेत संघाला पहिले यश मिळवून दिले. शुभमन गिल आपल्या पार्टनरवर वैतागल्याचेही पाहायला मिळाले. पण खरतर चुकी त्याचीच होती. दोघांच्यातील ताळेमेळाची कमी चेन्नईसाठी फायदेशीर ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.