sanju samson  
IPL

VIDEO : व्वा संजू! डोळ्याची पापणी लवायच्या आत काम तमाम

यष्टीमागे कर्णधार संजू सॅमसनने आपल्यातील चपळाई दाखवून दिली.

सुशांत जाधव

IPL 2021 DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या डावाला आकार देण्यासाठी संजू सॅमसनने पार्ट टाईम बॉलर राहुल तेवतियाचा (Rahul Tewatia) वापर अगदी चलाखीनं केल्याचे पाहायला मिळाले. आपल्या कर्णधाराने टाकलेला विश्वास सार्थ करत राहुल तेवतियाने श्रेयस अय्यरच्या रुपात संघाला मोठे यश मिळवून दिले. यावेळी यष्टीमागे कर्णधार संजू सॅमसनने आपल्यातील चपळाई दाखवून दिली.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कडून श्रेयस अय्यरने पंतच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरण्याचे काम केले. पंत परतल्यानंतर अर्धशतकाला अवघ्या 7 धावा कमी असताना तो बाद झाला. दिल्लीकडून त्याने 43 धावांचटी खेळओी केली. दिल्लीच्या डावातील 14 व्या षटकात तेवतियाने श्रेयस अय्यरला आपल्या जाळ्यात अडकवले.

फ्लायटेड चेंडू टाकून त्याने फलंदाजाला मोठा फटका मारण्यास प्रवृत्त केले. अय्यरने क्रिज सोडत हा चेंडू पुढे जाऊन टोलवण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. यष्टीमागे संजू सॅमसनने आपली जबाबदारी चोख पार पाडली.

श्रेयस अय्यरने क्रिजमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. पण डोळ्याची पापणी लवायच्या आत संजूने स्टम्पच्या बेल्स उडवत अय्यरला तंबूचा रस्ता दाखवला होता. अय्यरने थर्ड अंपायरच्या निर्णयाची प्रतिक्षा केली खरी पण अखेर संजूच जिंकला. श्रेयस अय्यरला तंबूत परतावे लागले. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने बॅटिंगमध्येही कमालीची कामगिरी केली. त्याने 53 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 70 धावांची खेळी केली. त्याची एकतर्फी खेळी व्यर्थ ठरली. संघातील इतर कोणत्याही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. त्यामुळे राजस्थानला पराभव स्विकारावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT