Shikhar Dhavan Twitter
IPL

IPL 2021: गब्बरनं मोडला कोहली-रोहितचा रेकॉर्ड

सलग सहाव्यांदा एका हंगामात 400 + धावांचा पल्ला पार करुन दाखवला.

सुशांत जाधव

SRH vs DC: दिल्ली कॅपिटल्स (DC vs SRH) ने दिमाखदार खेळ दाखवत सनरायझर्स हैदराबादला 8 गडी आणि 13 चेंडू राखून पराभूत केले. दिल्लीच्या विजयात नॉर्तजेनं मोलाची भूमिका बजावली. दोन विकेट घेऊनही त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्याशिवाय दिल्लीकडून श्रेयस अय्यरने 41 चेंडूत 47 धावांची नाबाद खेळी केली. दुसरीकडे कर्णधार पंतने 31 चेंडूत 35 धावांवर नाबाद राहिला.

सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) 42 धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. याशिवाय त्याने खास विक्रम आपल्या नावे नोंदवला. धवनने सलग सहाव्यांदा एका हंगामात 400 + धावांचा पल्ला पार करुन दाखवला.

यंदाच्या हंगामात धवनने 9 सामन्यात 422 धावा केल्या आहेत. 2016, 2017, 2018 ,2019 आणि 2020 च्या हंगामातही त्याने 400 + धावा केल्या होत्या. आयपीएल स्पेशलिस्ट सुरेश रैना आणि डेविड वॉर्नर यांनी सलगत 7 वेळा एका हंगामात 400 + धावा करण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.

धवनने मोडला कोहली रोहितचा विक्रम

आयपीएलच्या इतिहासात आठव्यांदा धवनने एका हंगामात 400+ धावा केल्या आहेत. या कामगिरीसह त्याने डेविड वॉर्नर, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. या तिघांच्या नावे एका हंगामात 7 वेळा 400 + धावा करण्याचा विक्रम आहे. धवनने 2011, 2012, 2016, 2017, 2018, 2019, 2020 आणि 2021 च्या हंगामात 400 + धावा केल्या आहेत.

सर्वाधिक चौकार मारणारा खेळाडू

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन अव्वलस्थानी आहे. धवनने आतापर्यंत 640 चौकार खेचले आहेत. या यादीत किंग कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावे 525 चौकाराची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT