MI vs CSK 
IPL

MI Vs CSK Fantasy Dream11: कोणते खेळाडू ठरतील फायद्याचे?

Fantasy Dream11 मध्ये कोणते खेळाडू घेणं फायद्याच ठरेल, यासंदर्भात अंदाज बाधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सुशांत जाधव

MI Vs CSK Fantasy Dream11 : दुबईच्या मैदानातील मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हायहोल्टेज लढतीनं आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात होत आहे. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा संघ मुंबई इंडियन्सपेक्षा भारी ठरला आहे. दिल्ली पाठोपाठ सर्वाधिक सामने जिंकून चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे मुंबई रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने पहिल्या टप्प्यात दमदार कामगिरी केली असली तरी त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने चेन्नई सुपर किंग्जचा संघ मैदानात उतरेल.

दोन्ही संघात तगडे फलंदाज आहेत. या लेखाच्या माध्यमातून आपण दोन्ही संघातील मिळून कोणते 11 खेळाडू चांगली कामगिरी करु शकतील. Fantasy Dream11 मध्ये कोणते खेळाडू घेणं फायद्याच ठरेल, यासंदर्भात अंदाज बाधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विकेट किपर

मुंबई इंडियंन्सच्या संघात विकेट किपर बॅट्समनच्या स्वरुपात क्विंटन डिकॉकची निवड फायद्याची ठरु शकते. चेन्नई विरुद्ध डिकॉकचे रेकॉर्ड चांगले आहे. मुंबईच्या डावाची सुरुवात करत असल्यामुळे त्याला अधिक चेंडू खेळायला मिळतात. सहाजिकच Fantasy Dream11 मध्ये त्याची निवड अधिक पाँइट्सची कमाई करुन देऊ शकते.

चार फलंदाज

रोहित शर्माही चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध चांगला खेळतो. सध्या तो दमदार फॉर्ममध्येही आहे. त्याच्याशिवाय मुंबई इंडियन्सचा मध्यफळीतील सूर्यकुमार यादव हा देखील Fantasy Dream11 साठी योग्य निवड ठरु शकेल. चेन्नईकडून सुरेश रैना आणि अंबाती रायडू हे खेळाडू अधिक पाँइट्स मिळवून देणारे ठरु शकतात. फाफ ड्युप्लेसी फिट असेल तर त्याची निवडही योग्यच ठरेल.

Fantasy Dream11 मध्ये तीन अष्टपैलूची निवड अधिक फायद्याची

Fantasy Dream11 निवडताना जर विकेट किपर म्हणून तुम्ही एकाचीच निवड केली तर अष्टपैलूच्या यादीतील अधिक खेळाडू निवडण्याचा पर्याय असतो. या यादीत रविंद्र जाडेजा, मोईन अली आणि केरॉन पोलार्ड हे त्रिकूट अधिक पाँइंट्स मिळवण्याची शक्यता अधिक

गोलंदाजीमध्ये बुमराह आणि चाहरला पंसती

फिरकीपटू राहुल चाहर 11 विकेटसह मुंबईकडून सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहलाही पसंती देणं फायद्याच गणित ठरु शकते. चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजाचा विचार केल्यास सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या दीपक चाहरही योग्य निवड असू शकेल.

कर्णधार आणि उप-कर्णधार

दोन्ही संघातील आघाडीचा फलंदाजाला कॅप्टन तर अष्टपैलू खेळाडूला उप-कर्णधार म्हणून निवडणे एक चांगला गेमप्लॅन असू शकतो.

Fantasy Dream11

विकेटकीपर: क्विंटन डिकॉक

फलंदाज: रोहित शर्मा, सुरेश रैना, अंबाती रायडू, सूर्यकुमार यादव (फाफ डुप्लेसिस, ऋतुराज गायकवाड यापैकी एकाचीही निवड करु शकता.)

अष्टपैलू: रविंद्र जाडेजा, मोईन अली, केरॉन पोलार्ड/क्रुणाल पांड्या

गोलंदाज: ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर (दीपक चाहर)

टीप : (Fantasy Dream11 खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं हा लेख लिहिलेला नाही. ट्रेंडिगमधील विषयानुरुप याला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT