BCCI च्या अँटी करप्शन युनिटकडून तपासाला सुरूवात
IPL 2021 RR vs PBKS: राजस्थान रॉयल्स संघाने पंजाब किंग्स संघाचा पराभव केला. लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शतकी सलामी दिली. त्या दोघांनी १२० धावांची भागीदारी केली होती. पण त्यानंतर मात्र, सामना हळूहळू पालटला. शेवटच्या षटकात पंजाबला ४ धावांची गरज होती. पंजाबच्या हातात ८ गडी होते. पण असं असूनही पंजाबला सामना जिंकता आला नाही. असं असतानाच आता पंजाबच्या एका खेळाडूवर कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे.
पंजाब संघाचा अष्टपैलू खेळाडू दिपक हुडा मंगळवारी Playing XIमध्ये खेळला. निर्णायक क्षणी त्याला फलंदाजीला पाठवण्यात आले, पण त्याला आवश्यक धावा करता आल्या नाहीत. असे असतानाच सध्या मात्र तो खेळाडू सामना सुरू होण्याआधीच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवरून चर्चेत आला आहे. दीपक हुडाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर एक फोटो पोस्ट केला होता. त्या पोस्टमध्ये दीपक हुडाने पंजाबची जर्सी आणि हेल्मेट घातले होते. त्या पोस्टला 'Here we go again' असं कॅप्शन लिहिलं होतं. ही पोस्ट सामन्याच्या आधीची होती. त्यामुळे या पोस्टमधून दीपक हुडा याला Playing XIमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहं असा संदेश तो फिक्सिंग माफियांना देत होता, असा दावा काही लोकांनी केला.
BCCI करतंय तपास
दीपक हुडाच्या इन्स्टाग्राम पोस्टची BCCIने दखल घेतली. शब्बीर हुसेन शेखादाम खंडवावाला यांच्या अध्यक्षतेखालील BCCIचा लाचलूचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. हा विभाग IPL मधील घडामोडींवर लक्ष ठेवून असतो. दीपक हुडाने जी इन्स्टाग्राम पोस्ट टाकली त्यावर आता हा विभाग तपास करणार असल्याने दीपक हुडावर कारवाईची टांगती तलवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.